Photo Credit- X

Prateik Patil Babbar and Priya Banerjee Wedding: बॉलिवूड अभिनेता प्रतीक पाटील बब्बर (Prateik Patil Babbar) आणि अभिनेत्री प्रिया बॅनर्जी (Priya Banerjee) त्यांच्या नात्याला एका नवीन पातळीवर घेऊन जाण्याच्या तयारीत आहेत. 14 फेब्रुवारी 2025 रोजी व्हॅलेंटाईन डेच्या खास प्रसंगी ते दोघेही लग्नबंधनात अडकतील. मिळालेल्या वृत्तानुसार, खाजगीरित्या मोजक्या पाहूण्याच्या उपस्थितीत प्रतीक पाटील वांद्रे येथील त्याच्या घरी लग्नाचे विधी पार पडतील. या खास प्रसंगी फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित राहतील.(‘Nadaaniyan’ First Look: इब्राहिम अली खानचा डेब्यू चित्रपट 'नादानियां' चा फर्स्ट लूक समोर, लवकरच होणार नेटफ्लिक्सवर प्रदर्शित (See Post))

प्रतीक बब्बर आणि प्रिया बॅनर्जी व्हॅलेंटाईन डे ला लग्न करणार 

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

जोडप्याला त्यांचे चाहते शुभेच्छा देत आहेत.  प्रतीक पाटील बब्बर आणि प्रिया बॅनर्जी यांनी गेल्या वर्षी इंस्टाग्रामवर त्यांच्या नात्याविषयी अधिकृतरित्या माहिती दिली होती.

कोण आहे प्रिया बॅनर्जी?

प्रिया बॅनर्जी ही एक दक्षिण भारतीय अभिनेत्री आहे. तिने दक्षिण चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीची सुरुवात किस चित्रपटापासून केली होती. याशिवाय ती ऐश्वर्या राय बच्चनच्या 'जज्बा' चित्रपटात दिसली होती. तिने 'बेकाबू', 'राणा नायडू' आणि 'हॅलो मिनी' सारख्या मालिकांमध्येही काम केले आहे.

प्रतीक हा राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा मुलगा

प्रतीक बब्बर हा ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा आहे.

पहिले लग्न सान्या सागरसोबत

प्रतीक बब्बरने चित्रपट निर्मात्या सान्या सागरशी अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर 2019 मध्ये लग्न केले. पण फक्त एका वर्षानंतर 2020 मध्ये दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि ते वेगळे झाले. त्यानंतर, जानेवारी 2023 मध्ये या जोडप्याने अधिकृतपणे घटस्फोट घेतला. यानंतर, नोव्हेंबर 2023 मध्ये, प्रतीकने प्रिया बॅनर्जीसोबत साखरपुडा केला.