OTT Release This Month: या महिन्यात ओटीटीवर असणार मनोरंजनाची दिवाळी; Money Heist 5 पासून ते 'भूत पोलीस' पर्यंत प्रदर्शित होत आहेत अनेक फिल्म्स व सिरीज
Money Heist (Photo Credits: Twitter)

आजपासून सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. हा महिना ओटीटी (OTT) प्रेक्षकांसाठी खूप खास असणार आहे, कारण या महिन्यात अनेक बहुप्रतीक्षित चित्रपट आणि वेब सिरीज वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतील. या महिन्यात सर्वात उत्सुकता आहे ती ‘मनी हाईस्ट’ च्या पाचव्या सिझन (Money Heist Season 5) बाबत. मनी हाईस्टचा पाचवा सीझन 3 सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. हा सिझन दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे, त्याचा पहिला भाग सप्टेंबरमध्ये तर दुसरा भाग डिसेंबरमध्ये प्रदर्शित होईल.

अपारशक्ति खुराना आणि प्रनूतन बहल हे सतराम रमानी यांच्या 'हेलमेट' (Helmet) या डेब्यू चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाची कंडोमशी निगडीत आहे तसेच सामाजिक संदेशही देते. मित्रांचा समूह पैसे कमवण्यासाठी ई-कॉमर्स ट्रक लुटतो पण त्यांना आतमध्ये कंडोम सापडतात. हेल्मेट ZEE5 वर 3 सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे.

मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यांवर आधारित वेब सीरिज, मुंबई डायरी 26/11 (Mumbai Diaries 26/11) या महिन्यात 9 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होत आहे. प्रेक्षक या वेब सीरिजबद्दल खूपच उत्सुक आहेत. या मालिकेत बॉलिवूड अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, श्रेय धन्वंतरी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती आणि तापसी पन्नूचा हॉरर कॉमेडी चित्रपट ऐनाबेले सेतुपतिचा (Annabelle Sethupathi) ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा हॉरर कॉमेडी चित्रपट हॉटस्टारवर 17 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होईल. विजय सेतुपती आणि तापसी पन्नू व्यतिरिक्त जगपती बाबू आणि योगी बाबू सारखे सुप्रसिद्ध स्टार्स या चित्रपटात दिसणार आहेत.

सुप्रसिद्ध दक्षिण अभिनेता विजय सेतुपतीचा आणखी एक चित्रपट ‘तुघलक दरबार’ देखील या महिन्यात 11 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री राशी खन्ना दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाच्या ब्लॉकबस्टर चित्रपट अंधाधुनचा दक्षिण रिमेक असलेला 'मायस्ट्रो' देखील या महिन्यात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नितीन, तमन्ना दिसणार आहेत. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर 10 सप्टेंबर 2021 रोजी रिलीज होईल.

बॉलीवूड अभिनेते सैफ अली खान, अर्जुन कपूर, यामी गौतम, जॅकलिन फर्नांडिस असा मल्टिस्टारर चित्रपट ‘भूत पोलिस’ची (Bhoot Police) प्रेक्षकांना उत्सुकता आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट असणार आहे जो, 17 सप्टेंबरला OTT प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर रिलीज होईल.

टीव्ही अभिनेत्री आणि नागिन फेम सुरभी ज्योती हिचा 'क्या मेरी सोनम गुप्ता बेवफा है' हा चित्रपटही याच महिन्यात 17 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटात सुरभी ज्योती सोबत जस्सी गिल दिसणार आहे. हा विनोदी चित्रपट ZEE5 वर 17 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. (हेही वाचा: सोशल मीडियावरील 'मणिके मंगे हिते' गाण्याची सर्वांनाच पडली भुरळ, अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक अभिनेत्यांनी केले कौतुक, पहा याचा व्हिडीओ)

ल्युसिफरचे भारतात खूप जास्त चाहते आहेत. याचा पाचवा सीझन प्रेक्षकांना खूपच आवडला होता. आता ल्युसिफरचा सहावा सिझन (Lucifer Season 6) 10 सप्टेंबरला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. तो तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकाल.