Oscars-2020 (Photo Credits- Instagram)

सिनेसृष्टीतील सर्वात मोठा आणि मानाचा पुरस्कार म्हणून ओळखल असेलला 'ऑस्कर पुरस्कार' (Oscars  2020) सोहळा 9 फेब्रुवारीला पार पडणार आहे. या पुरस्कराची आतुरतेने वाट पाहण्यासोबत त्यासाठी कोणत्या चित्रपटाची वर्णी लागते हे पाहणे  सुद्धा तितकेच महत्वाचे असते. यंदाच्या ऑस्करचे आयोजन हॉलिवूडच्या Boulevard, Los Angeles च्या डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी जगभरातील प्रसिद्ध कलाकार मंडळी उपस्थित राहतात. या दिमाखादार सोहळ्यादरम्यान किर्क डगलस आणि कोबी ब्रायंट सारख्या दिग्गजांना श्रद्धांजली देण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर ऑस्कर सोहळ्यापूर्वी नामांकनांची घोषणा 13 जानेवारील करण्यात आली होती. यामध्ये विविध चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेत्यांसह अन्य कॅटेगरींसाठी पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. त्यामुळे आता ऑस्कर पुरस्काराने कोणाला गौरवण्यात येणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

कुठे आणि कसा पहाल ऑस्कर पुरस्कराचा सोहळा?

ऑस्कर्स पुरस्कार सोहळा 9 फेब्रुवारी (अमेरिकेच्या वेळेनुसार) आणि भारतात 10 वाजता सकाळी प्रदर्शित होणार आहे. येथे रेड कार्पेट, एक्सक्लूझिव्ह मुलाखत, प्रेसेंटर्स, नॉमिनिज आणि परफॉर्मन्स सुद्धा सादर करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा ट्वीटवरवरुन लाईव्ह पाहण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्री ऑस्कर्सचे कवरेज करण्याचा मान Billy Porter टॉक शो होस्ट Tamron Hall, सुपरमॉडल Lily Aldridge आणि चित्रपट क्रिटिक Elvis Mitchell यांना मिळाला आहे. (Grammy Awards 2020: मिशेल ओबामा आणि लेडी गागा यांनी जिंकला यंदाचा ग्रैमी अवॉर्ड; पाहा संपूर्ण यादी)

 

View this post on Instagram

 

Only one journey leads here. #Oscars

A post shared by The Academy (@theacademy) on

भारतीयांना कुठे पाहता येणार ऑस्कर पुरस्कार?

भारतीयांना ऑस्कर पुरस्कार Star Movies, Star Movies HD आणि Star Movies Select HD येथे लाईव्ह पाहता येणार आहे. त्याचसोबत हॉटस्टारवर सुद्धा पाहता येणार आहे.

ऑस्कर पुरस्कारासाठी यंदा सर्वोत्कृष चित्रपटासाठी नामांकनांमध्ये Ford v Ferrari, The Irishman, Jojo Rabbit, Joker, Little Women, Marriage Story, 1917, Once Upon a Time in Hollywood आणि Parasite यांचा समावेश आहे. तसेच Joker and Once Upon a Time या दोन चित्रपटांमध्ये पुरस्कारच्या मानासाठी टक्कर असणार आहे.