Navra Maza Navsacha 2 Box Office Collection : नवरा माझा नवसाचा 2 (Navra Maza Navsacha 2) ला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दमदार ओपनिंग केल्यानंतर चित्रपटाने चांगली कमाई सुरूच ठेवली आहे. वीकेंडला चित्रपटाने 7.84 कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी 1000 स्क्रिनमध्ये चित्रपट प्रदर्शित झाला. त्यातील 6000 पेक्षाही अधिक शोज हाऊसफुल्ल होते. चित्रपटाला पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद हा मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या ओपनिंग पैकी आहे. 1000 पेक्षा अधिक शोज ने सुरुवात केलेल्या या चित्रपटाला 600 पेक्षाही अधिक शोज हाऊसफुल्ल होते. (हेही वाचा: Navra Maza Navsacha 2 Box Office Collections Day 1: ‘नवरा माझा नवसाचा २’ ची दमदार ओपनिंग, पहिल्या दिवशी कमावले 2.25 कोटी)
नवरा माझा नवसाचा 2’ हा चित्रपट शुक्रवारी 20 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्या दिवशी राष्ट्रीय चित्रपट दिनाचा सिनेमाला फायदा झाला. 99 रुपयांना चित्रपट उपलब्ध झाल्याने मोठ्या संख्येने नागरिकांनी चित्रपट पाहिला. त्यानंतरचे दोन दिवस वीकेंड असल्याने चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
नवरा माझा नवसाचा 2 ला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद
प्रेक्षकांच्या BLOCKBUSTER प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद!
“आम्ही तुमचे खूप आभारी आहोत.”
.
.
📣 पाहत रहा संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात... 🚂🌺'नवरा माझा नवसाचा 2' 🌺🚂
IN CINEMAS NOW
Produced & Directed by @sachin.pilgaonkar pic.twitter.com/RpmTXLJ0tR
— Navra Maza Navsacha 2 (@N_M_Navsacha_2) September 23, 2024
अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे यांच्यासह मोठी स्टारकास्ट चित्रपटात आहे. नवस फेडण्यासाठी जातानाचा रेल्वे प्रवास, त्यात होणाऱ्या गमतीजमती हा चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. सोनू निगम, जॉनी लिवर, श्रिया पिळगांवकर हे पाहुणे कलाकार चित्रपटात पहायला मिळणार आहेत.