Nagarjuna Meet Specially Abled Fan: '...हे घडायला नको होते'; सुरक्षारक्षकाने धक्काबुक्की केलेल्या दिव्यांग चाहत्याची नागार्जुनने घेतली भेट(Watch Video)
Photo Credit- Instagram

Nagarjuna Meet Specially Abled Fan: दाक्षिणात्य कलाकार त्यांच्या विनंम्र वागणूकीमुळे आणि साधेभोळेपणामुळे जास्त ओळखले जातात. त्याचेच एक ताजे उदाहरण समोर आले आहे. मुंबई विमानतळावर काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य कलाकार नागार्जुन याच्या एका दिव्यांग चाहत्याला अभिनेत्याच्या सुरक्षारक्षकाने धक्काबुक्की केली होती. त्यावर आज अभिनेत्याने त्या चाहत्याची खास भेट घेतली आणि त्याच्या बरोबर फोटो काढले. त्यावेळी चाहत्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. नागार्जुन कामानिमित्त मुंबईत आला होता. बुधवारी, घरी परतत असताना मुंबई विमानतळावर त्याने चाहत्याला भेट दिली.त्यावेळी चाहत्याने या घटनेबद्दल माफी मागितली. पण नागार्जुनने उत्तर देत, 'अरे, माफ करू नका. तुमची चूक नव्हती, आमची चूक आहे', असे म्हटले.

चाहता माफी मागित असलेला व्हिडिओ अभिनेत्याने पुन्हा पोस्ट केला आणि म्हटले,'हे नुकतेच माझ्या लक्षात आले… हे घडायला नको होते!! मी त्या गृहस्थाची माफी मागतो आणि भविष्यात असे होणार नाही यासाठी आवश्यक ती खबरदारी घेईन !!!'

अभिनेता धनुषसोबत त्याच्या आगामी चित्रपटाचा काही भाग चित्रित करण्यासाठी नागार्जुन मुंबईत होता. हे दोघे डी५१ साठी चित्रीकरण करत आहेत. ज्याचे दिग्दर्शन शेखर कममुला करत आहेत. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना देखील आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला हे कलाकार जुहू बीचवर दिसले होते.