Ye Re Ye Re Paisa 2 Trailer:  कर्ज बुडव्या उद्योजकाचा शोध घेणार अण्णा आणि त्याची गॅंग (Watch Video)
Ye Re Ye Re Paisa 2 Trailer (Photo Credits: You Tube)

'ये रे ये रे पैसा' या धम्माल सिनेमाला प्रेक्षकांनी दिलेल्या तुफान प्रतिसादानंतर आता या सिनेमाचा सिक्वेल येण्यास सज्ज आहे. 9 ऑगस्टला रीलीज होणार्‍या ये रे ये रे पैसा 2 (Ye Re Ye Re Paisa 2) या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. डबल वसुली करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेवरून परतलेल्या अण्णाची प्रेक्षकांना असलेली उत्सुकता आता पूर्ण होणार आहे. कर्ज बुडव्या उद्योजक निरज शहा यांचा शोध लावण्याची जबाबदारी आता अण्णाच्या खांद्यावर आहे. नीरज आणि त्याचा शोध घेणाऱ्या अण्णा आणि त्याचे साथीदार यांची गोष्ट या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

ये रे ये रे पैसा 2 सिनेमामध्ये संजय नार्वेकर अण्णाची भूमिका साकरत आहे. तर त्याच्या साथीला आनंद इंगळे, मृण्मयी गोडबोले, अनिकेत विश्वासराव ही मंडळी आहेत. संजय नार्वेकर सोबतच या सिनेमामध्ये मृणाल कुळकर्णी, पुष्कर श्रोत्री, प्रसाद ओक हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हेमंत ढोमे याने 'ये रे ये रे पैसा 2' या सिनेमाच्या दिगदर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाचं शूटिंग प्रामुख्याने लंडनमध्ये करण्यात आलं आहे. Ye Re Ye Re Paisa 2 Teaser: अण्णा येता दारी असे सांगतोय 'ये रे ये रे पैसा 2' चा हा धमाकेदार टीजर

ये रे ये रे पैसा 2 ट्रेलर

'येरे येरे पैसा' सिनेमाच्या पहिल्या भागात उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, मृणाल कुलकर्णी हे कलाकार खास भूमिकेत दिसले होते. तर दिग्दर्शन संजय जाधव यांनी केलं होतं. आता पहिल्या भागाप्रमाणेच या सिनेमाच्या सिक्वेलला देखील रसिक प्रतिसाद देणार का? हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.