Ye Re Ye Re Paisa 2 Teaser: अण्णा येता दारी असे सांगतोय 'ये रे ये रे पैसा 2' चा हा धमाकेदार टीजर
Ye re Ye re Paisa 2 Teaser (Photo Credits: YouTube)

'ये रे ये रे पैसा' (Ye Re Ye Re Paisa) च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर चर्चा होती ती याच्या सिक्वेल ची. परंतू आता लवकरच प्रेक्षकांची प्रतिक्षा संपणार असून 9 ऑगस्टला 'ये रे ये रे पैसा' चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टिजर प्रदर्शित झाला. या टीजर मध्ये अण्णा म्हणजेच संजय नार्वेकर दक्षिण आफ्रिकेवरुन परतला असून तो काही तरी डबल वसुली करण्याच्या तयारीत आहे, असे दिसत आहे.

या सिक्वेलमध्ये संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) सह अनिकेत विश्वासराव (Aniket Vishwasrao), मृण्मयी गोडबोले (Mrinmayee Godbole) आणि प्रियदर्शन जाधव (PriyaDarshan Jadhav) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती अमेय खोपकर यांनी केली असून हेमंत ढोमे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. यात प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

Ye Re Ye Re Paisa 2 Motion Poster: 'अण्णा परत येतोय’ Memes चा उलगडा झाला; संजय नार्वेकर ची ' ये रे ये रे पैसा 2' पहिली झलक रसिकांच्या भेटीला

'ये रे ये रे पैसा' या चित्रपटाचा हा सिक्वेल हा बिगबजेट असून या चित्रपटाचं जवळपास ९० टक्के चित्रीकरण लंडनमध्ये झालं आहे.