Ye Re Ye Re Paisa 2 (Photo Credits: Twitter)

'अण्णा परत येतोय’ या मेसेजने सोशल मीडियामध्ये मागील काही दिवसांपासून अनेक मिम्स व्हायरल होत होते. मात्र आता याचा उलगडा झाला आहे. हा अण्णा म्हणजे 'ये रे ये रे पैसा 2'  (Ye Re Ye Re Paisa 2) मधील संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) आहे. 'ये रे ये रे पैसा' या सिनेमाचा सिक्वेल येणार असल्याची आता अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मात्र आता हा सिनेमा हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती अमेय खोपकर याने केली असून हेमंत ढोमे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या सिनेमात  प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

येरे येरे पैसा 2 पहिली झलक

'येरे येरे पैसा' सिनेमाच्या पहिल्या भागात उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, मृणाल कुलकर्णी हे कलाकार खास भूमिकेत दिसले होते. तर अण्णा या भूमिकेत असलेला संजय नार्वेकर दक्षिण आफ्रिकेला गेला होता. मात्र येरे येरे पैसा 2 मध्ये तो भारतामध्ये परतणार असल्याने वसुली डबल होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. येरे येरे पैसा 2 हा सिनेमा 9 ऑगस्टला रिलीज होणार आहे.