Vicky Velingkar Movie Poster: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी च्या मुख्य भूमिकेतील  ‘विक्की वेलिंगकर’सिनेमाचं पोस्टर रसिकांच्या भेटीला; 6 डिसेंबरला सिनेमा होणार रीलीज
Vicky Velingkar Movie Poster (Photo Credits: Instagram)

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘विक्की वेलिंगकर’या सिनेमाची पहिली झलक काही वेळापूर्वीच रसिकांसमोर आली आहे. सोशल मीडियामध्ये शेअर करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये सोनालीचा चेहरा दिसत नसला तरीही तिने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये तिच्या आगामी सिनेमाचं पोस्टर शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये या सिनेमाबद्दल उत्सुकता वाढली आहे. ब्ल्यू जीन्स आणि व्हाईट टी शर्टमध्ये तडफदार अंदाजात उभ्या असलेल्या सोनालीने आता सिनेमाबद्दल उत्सुकता वाढवली आहे. “वेळेचे पाऊल आणि ‘विक्की वेलिंगकर’ची चाहूल, फक्त काळालाच कळते!” अशा आशयाचे पोस्टर शेअर केल्याने या सिनेमात काही गूढ गोष्टी उलगडण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी सार्‍यांनाच किमान ट्रेलरची वाट पहावी लागणार आहे.

सोनाली कुलकर्णी ‘विक्की वेलिंगकर’ ही प्रमुख भूमिका साकारत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन सौरभ वर्मा करणार आहेत. तर रसिकांच्या भेटीला हा सिनेमा 6 डिसेंबर 2019 दिवशी रीलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वी सोनाली कुलकर्णीच्या 'हिरकणी' सिनेममचीदेखील मोशन पोस्टरच्या माध्यमातून खास झलक रसिकांसमोर आली आहे. नटरंग, अजिंठा, झपाटलेला-2, क्लासमेट, मितवा, हंपी या सिनेमातून सोनाली यापूर्वी रसिकांच्या भेटीला आली होती. येत्या वर्ष भरात सोनालीचे 3 मोठे सिनेमे रसिकांच्या भेटीला येणार आहेत. Shivrajyabhishek Geet: हिरकणी चित्रपटातील शिवराज्याभिषेक गीत प्रेक्षकांच्या भेटीला; 9 कलाकार, 6 लोककलांच्या माध्यमातून छ. शिवरायांना मानाचा मुजरा

 ‘विक्की वेलिंगकर’ पोस्टर

‘विक्की वेलिंगकर’या चित्रपटाची निर्मिती जीसिम्स, अनुया चौहान कुडेचा, रितेश कुडेचा, सचिन लोखंडे आणि अतुल तारकर यांनी केली आहे.