Tu Sang Na Song in Mann Fakiraa: नात्यातील गुंता शब्दांतून सोडविण्याचा प्रयत्न करणारे मन फकिरा चित्रपटातील 'तू सांग ना' गाणे, Watch Video
Mann Fakiraa Movie Song (Photo Credits: YouTube)

अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) आणि अभिनेता सुव्रत जोशी (Suvrat Joshi) यांची प्रमुख भूमिका असलेला 'मन फकिरा' (Mann Fakiraa) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) यांनी या चित्रपटाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. यात सायली आणि सुव्रत सह अंकित मोहन (Ankit Mohan) आणि अंजली पाटील (Anjali Patil) देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटातील 'तू सांग ना' हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात या चारही कलाकारांच्या नात्यातील गुंता शब्दांतून सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.

हे गाणे सौमिल श्रृंगारपुरे यांनी गायिले असून वैभव जोशी या गीतकार आहेत. स्मिता विनायक गणू, नितीन प्रकाश वैद्य हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

पाहा व्हिडिओ:

हेदेखील वाचा- Mann Fakiraa Trailer: मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित 'मन फकीरा' सिनेमाचा ट्रेलर आऊट! (Watch Video)

ही चार तरुणांची ही गोष्ट असून प्रेम, लग्न आणि नात्यातील गुंतागुत यावर सिनेमा बेतलेला आहे. यांच्या नात्यात असलेली गुंतागुत कशी सुटणार आणि नात्यांचा खरा अर्थ या चौघांनाही उगमणार का? हे आपल्याला सिनेमात पाहायला मिळणार आहे.

हा सिनेमा 6 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वैभव जोशी आणि क्षितिज पटवर्धन यांनी या सिनेमाची गाणी लिहिली आहेत. तर सौमिल शृंगारपुरे यांनी सिनेमाचे संगीत दिग्दर्शन केले आहे.