Ti And Ti Motion Poster: 'ती आणि ती' येण्याने आयुष्यात होणाऱ्या धम्माल मस्तीसह चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला
ती आणि ती चित्रपट (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Ti And Ti Motion Poster: सध्या मराठी सिनेसृष्टीत विविध कथांवर आधारित असलेले चित्रपट प्रदर्शित केले जातात. असाच एक चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog)  याने ट्वीटरच्या माध्यमातून पोस्ट केले आहे. ती आणि ती असे या चित्रपटाचे नाव असून त्यात पुष्करसह प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) आणि सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) झळकणार आहे.

पुष्कर जोग ह्याचा ती आणि ती चित्रपट मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित करत आहे. तसेच आनंद पंडित, पुष्कर जोग आणि मोहन नादार या चित्रपटाचे निर्माते आहेत. या पोस्टरमध्ये प्रार्थना ही पुष्करकडे प्रेमाने पाहत आहे. तर सोनली कुलकर्णी ही आपल्याच नादात मग्न असलेली पाहायला मिळत आहे.

या चित्रपटाचे शूटींग परदेशात करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.  अद्याप या चित्रपटाची कथा नेमकी काय असणार हे सांगण्यात आलेले नाही. तसेच या तिघांच्या जोडीसह अजून कोणते कलाकारांची धम्माल मस्ती पाहायला मिळणार हे अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आलेले आहे. येत्या 1 मार्च 2019 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.