Thackeray Movie First Day First Show: बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' (Thackeray ) सिनेमा 25 जानेवारीपासून हिंदी आणि मराठी भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच आत्मचरित्र लिहले नाही त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे याच्या पलिकडे असलेले ठाकरे नेमके कसे होते? हा त्यांचा जीवनप्रवास पहिल्यांदाच सिनेमाच्या माध्यमातून रसिकांसमोर येणार आहे. त्यामुळे या सिनेमाबाबत त्यांच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. म्हणूनच महाराष्ट्रात भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदा 'ठाकरे' सिनेमा पहाटे चार वाजता रीलीज करण्यात येणार आहे. 'ठाकरे' सिनेमामधून सचिन खेडेकरचा आवाज गायब, तुम्ही ऐकली का 'Thackeray' ची नवी झलक
वडाळ्याच्या आयमॅक्स थिएटर्समध्ये 'ठाकरे' सिनेमाचा पहिला शो सकाळी 4.15 वाजता सुरू होणार आहे. अशी माहिती स्पॉटबॉय या वेबसाईटने दिली आहे. ऐरवी सिनेमाचा पहिला शो सकाळी 7 वाजता असतो. परंतू बाळ ठाकरेंचा जीवनपट 'ठाकरे' या प्रथेला अपवाद ठरला आहे. यापूर्वी दाक्षिणात्य सिनेमांमध्ये अशाप्रकारे पहाटे, मध्यरात्रीचे शो आयोजित करण्यात आले आहेत. तामिळनाडूमध्ये रजनीकांतचा 'Petta' आणि अजितच्या 'Viswasam'या सिनेमाच्या बॉक्सऑफिसवरील क्लॅशमध्ये Viswasam ला मध्यरात्री 1 आणि Petta ला पहाटे 4 चा शो देण्यात आला होता.
'ठाकरे' हा मराठी आणि हिंदी भाषेतील सिनेमा 25 जानेवारी दिवशी रीलीज होणारा एकमेव सिनेमा असायला हवा अशी काहींनी मागणी केली होती. मात्र 'ठाकरे' सिनेमासोबत 'मणिकर्णिका' हा राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यावर आधारित जीवनपट रीलिज होणार आहे.