Naal Movie | (Photo Credits- YouTube)

फँड्री आणि  सैराटच्या अभूतपूर्व यशानंतर झी स्टुडिओज् आणि नागराज मंजुळे ही जोडी मराठी रसिकांसाठी त्यांचा आगामी चित्रपट ‘नाळ’ घेऊन येत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर आला आहे. हा चित्रपट १६ नोव्हेंबर २०१८ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून याची निर्मिती आटपाट आणि मृदगंध फिल्म्सने केली आहे तर सुधाकर रेड्डी य्क्कंती याचं दिग्दर्शन आहे. नागराज मंजुळे यांनी चित्रपटाचे संवाद लिहिले असून प्रस्तुती झी स्टुडिओजने  केली आहे. नक्की वाचा:  नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड'मध्ये अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत, नागपूरात होणार शूटिंग.

पहा नाळ चित्रपटाचा टीझर

 

झी स्टुडिओजने  आता पर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यात फास्टर फेणे, व्हेन्टिलेटर, गुलाबजाम, येरे येरे पैसा आणि पुष्पक विमान या चित्रपटांचा समावेश आहे. मराठी चित्रपट इतिहासात १०० कोटी कमवणारा पहिलाच चित्रपट सैराट हा सुद्धा त्यांचाच असून त्याचं दिग्दर्शन नागराज मंजुळेनेच केलं होतं. नागराज यांची खासियत म्हणजे उत्तम दिग्दर्शन आणि छायाचित्र. सैराट नंतर या चित्रपटाच्या टीझरमध्ये सुद्धा ते उत्तम रित्या साकारण्यात आले आहे. आणि विशेष बाब म्हणजे हा संपूर्ण टीझर हा एकाच शॉटमध्ये घेण्यात आला आहे. म्हणून प्रेक्षकांना ‘नाळ’ चित्रपटाबद्दल उत्सुकता असेल ह्याच शंकाच नाही.