'अशी ही बनवाबनीवी'ची यशस्वी ३० वर्षे; रसिकांच्या हृदयात आजही अढळ स्थान
Ashi hi Banwa Banwi | (Photo Credits- Facebook @AshiHiBanvaBanviOfficial)

'तुमचे दिलेले सत्तर रुपये वारले.' हे वाक्य जेव्हा, आपण ऐकतो तेव्हा, डोळ्यासमोर अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सुधीर जोशी हे त्रिकुट येतं.  'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटातलं हे दृश्य. सचिन पिळगावकर दिग्दर्शित या  चित्रपटाला प्रदर्शित होऊन रविवारी (२३ सप्टेंबर)  ३० वर्षे पूर्ण झाली.  इतक्या प्रदीर्घ काळानंतरही हा चित्रपट रसिक प्रेक्षकांवरची आपली जादू टिकवून आहे. असं भाग्य फारच मोजक्या चित्रपटांच्या वाट्याला येतं.

बनवा बनवी प्रदर्शित झाला तेव्हा इंटरनेटचा 'इं'सुद्धा आपल्याला माहिती नव्हता. त्यामुळे सोशल मीडिया, व्हायरल वैगेरे हा प्रश्न उपस्थित होत नाही. तरीही हा चित्रपट जवळपास ३० दशकांनंतर आपली जादू टिकवून आहे. आजही हा चित्रपट टीव्हीवर लागला की, निखळ हास्याचा आनंद नव्याने देतो. हा चित्रपट रसिकांच्या हृदयापर्यंत इतका पोहोचला आहे की, टीव्ही mute (मौन)  मोडवर असला तरीही संवाद आपोआप कळतो.

'धनंजय माने इथेच राहतात का? हा माझा बायको पार्वती, सारखं सारखं त्या झाडावर काय? असे बरेच संवाद लोकांच्या तोंडपाठ आहेत. इतकंच नव्हे तर आजू बाजूला चाललेल्या घडामोडींवर पण नेटकर ह्याच चित्रपटाला धरून memes बनवतात. जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्राएल दौऱ्यावर जाणार होते तेव्हा नेटकर त्यांना डायबेटिसचं औषध आणायला सांगायचं विसरत नाहीत. जेव्हा ५०० आणि १००० च्या नोटा बंद झाल्या तेव्हा सुद्धा लोकांनी ह्याच चित्रपटाचा आधार घेऊन मोदींना ट्रॉल केलं. हे सगळं या चित्रपटाची लोकप्रियता दाखवणारेच आहे.

बॉक्सऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारे ५ ब्लॉकबस्टर मराठी सिनेमे.

एकूणच काय तर, सचिन पिळगावकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, सुशांत रे, सुप्रिया पिळगावकर, निवेदिता सराफ, प्रिया बेर्डे आणि अश्विनी भावे ह्यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ह्या चित्रपटाची जादू अशीच मराठी माणसाच्या येणाऱ्या कित्येक पिढ्यांवर अशीच राहील ह्यात शंकाच नाही.