Sonalee Kulkarni In South Movie: मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) ही लवकरच 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' (Tararani) या चित्रपटामध्ये दिसणार आहे. सोनालीने तिच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लवकरचं दाक्षिणात्य चित्रपटात दिसणार आहे. सोनालीच्या चाहत्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. सध्या सर्वत्र सोनालीच्या या चित्रपटाची चर्चा सुरू आहे.
सोनालीने तिच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर इन्स्टाग्रामवरून शेअर केलं आहे. तिच्या या आगामी दाक्षिणात्य चित्रपटाचं नाव 'मलाईकोट्टई वालिबन' (Malaikottai Vaaliban) असं आहे. या पोस्टरमध्ये डोंगर-दऱ्या, नदी, झाडं-झुडूप दिसत आहेत. याशिवाय या पोस्टरमध्ये तीन पावलं दिसत आहेत. हे पावलं पाहून चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. (हेही वाचा - Phakaat Teaser: हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे प्रमुख भूमिकेत असलेल्या 'फकाट' चित्रपटाचा पहा धमाकेदार टीझर (Watch Video))
सोनालीने आपल्या पोस्टरला कॅप्शन देताना लिहिलं आहे की, 'मलाईकोट्टई वालिबन' चं पोस्टर तुमच्या भेटीला. हॅपी इस्टर. आजच्या दिवशी तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. चित्रपटाचं पहिलं पोस्टर. येत्या 14 एप्रिल रोजी या चित्रपटाबाबत एक महत्वाची घोषणा होणार आहे.'
View this post on Instagram
अभिनेत्रीच्या पोस्टनंतर चाहते या चित्रपटाचा टीझर येत्या 14 एप्रिल रोजी प्रदर्शित होऊ शकतो, असा अंदाज बांधत आहेत. रिपोर्ट्सनुसार, सोनालीचा हा चित्रपट डिसेंबर 2023 मध्ये प्रदर्शित होऊ शकतो.