'धुरळा' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी चा हटके  ग्लॅमरस लूक सोशल मिडियावर व्हायरल, पाहा फोटोज
Sonalee Kulkarni (Photo Credits: Instagram)

धूळ उडविणारा 'धुरळा' (Dhurala) असे ब्रीद वाक्य असलेला राजकीय खेळीचा एक नवा डाव मांडत नुकताच धुरळा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. समीर विध्वंस दिग्दर्शित हा चित्रपट येत्या 3 जानेवारी 2020 रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेचा विषय बनत चालला आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणारी सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिने या चित्रपटाच्या प्रमोशच्या दृष्टीने साडीतला एक हटके ग्लॅमरस लूक सोशल मिडियावर शेअर केला आहे. हा लूक पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत. यात तिचा बोल्ड आणि हॉट लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

रंगीत साडी, त्यावर शूज, स्लिवलेस ब्लाउज, ऑक्साइडची नोझ रिंग असा हा ग्लॅमरस लूक असून सध्या तिचा हा बोल्ड लूक सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे.

हेदेखील  वाचा- 'Dhurala' Star Cast Poster Out: सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर, अंकुश चौधरी यांच्यासह मराठीतील 'या' लोकप्रिय कलाकारांवर रंगांची उधळण करणा-या 'धुरळा' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

एकाच घरातील राजकीय सत्तासंघर्ष आणि त्यातून निर्माण झालेला राजकीय धुरळा या चित्रपटातून दाखविण्यात आला आहे. या चित्रपटात सोनाली सह सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav), सई ताम्हणकर (Sai Tamhankar), अंकुश चौधरी (Ankush Chaudhari), सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni), अमेय वाघ (Amey Wagh), प्रसाद ओक (Prasad Oak) आणि ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

झी स्टुडिओज मराठी ने ट्विटरच्या माध्यमातून या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. या पोस्टरमध्ये या चित्रपटातील प्रमुख कलाकारांवर रंगांची उधळण करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या लेखनाची धुरा क्षितिज पटवर्धन यांनी सांभाळली असून झी स्टुडिओज, अनीश जोग, रणजित गुगळे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.