सोनाली कुलकर्णी हिचे होणारा नवरा कुणाल बेनोडेकर सोबत रोमॅंटिक फोटोशुट पाहुन तुम्हीही म्हणाल WOW! (Photos Inside)
Sonalee Kulkarni Kunal Benodekar (Photo Credits: Instagram)

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिच्या साखरपुड्याला (Engagement) नुकतेच सहा महिने पुर्ण झाले आहेत. सोनालीने 18 मे ला आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन आपल्या चाहत्यांना याबाबत माहिती दिली. लॉकडाऊन सुरु होण्याच्या आधीच म्हणजेच 2 फेब्रुवारी रोजी सोनालीने कुणाल बेनोडेकर (Kunal Benodekar) याच्याशी आपल्या कुटुंबियांच्या उपस्थितीत दुबईमध्ये (Dubai) साखरपुडा करून घेतला होता. अद्याप सोनालीने लग्नाच्या बाबत कोणतीही माहिती दिली नसली तरी आता साखरपुड्याला 6 महिने पुर्ण झाल्याच्या निमित्ताने सोनालीने कुणाल व त्याच्या कुटुंबासोबत एक मस्त फोटोशुट केले आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरुन हे फोटो शेअर केले असुन तिचे फॅन्स सुद्धा यावर खुश झाले आहेत.

या फोटोमध्ये सोनालीने आकाशी रंगाचा गाऊन परिधान केला आहे. कुणाल बेनोडेकर तिचा हात पकडून तिला प्रपोज करतानाचा हा क्युट फोटो आहे. दुबईच्या वाळवंटात हे फोटोशूट करण्यात आले आहे असे तरी या फोटोवरुन दिसत आहे. सोनाली कुलकर्णी हिचा होणारा नवरा कुणाल बेनोडेकर नेमका आहे कोण? जाणून घ्या त्याच्याविषयी 'या' खास गोष्टी

सोनाली कुलकर्णी पोस्ट

सोनालीने कुणाल आणि आपल्या कुटुंंबासोबत सुद्धा फोटोशुट केलंं आहे,जेव्हा फॅमिली एकत्र येतात असं कॅप्शन देऊन सोनालीने हे फोटो शेअर केलेत.

 

View this post on Instagram

 

When the families “bond”ed 🔫 ;) #6monthsago #thisday #02022020 #engaged 💍💍

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

दरम्यान सोनालीचा होणारा नवरा कुणाल बेनोडेकर हा दुबई येथे चार्टर्ड अकाउंटंट आहे. तो लंडन मध्ये वास्तव्यास असुन काही वर्षांपासुन कामानिमित्त दुबई येथे असतो. मागील अनेक वर्ष कुणाल आणि सोनाली एकमेकांना डेट करत आहेत. साखरपुड्या नंंतर आता काही दिवसांपासुन दोघेही दुबई मध्ये एकत्र राहत आहेत.