Vicky Velingkar Official Trailer: सस्पेंन्स, थ्रीलर आणि सोनाली कुलकर्णी च्या पॉवरफुल अभिनयाचे मिश्रण असलेला विक्की वेलिंगकर चा ट्रेलर प्रदर्शित, Watch Video
Vicky Velingkar Trailer (Photo Credits: YouTube)

अप्सरा फेम सोनाली कुलकर्णीचा (Sonalee Kulkarni) आतापर्यंतचा सर्वात हटके रोल घेऊन 'विक्की वेलिंगकर' (Vicky Velingkar) हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सोनाली पहिल्यांदाच कॉमिक बुक आर्टिस्टच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून यात सोनालीच्या दमदार अभिनयाची एक झलक पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे फर्स्ट लूक प्रदर्शित होताच या चित्रपटाविषयी उत्सुकता आणखीनच वाढली होती. त्यात आता सस्पेंन्स, थ्रीलर भरून असलेल्या या ट्रेलरमुळे या चित्रपटाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

आयुष्य हे अनेक सरप्रायजेसने भरलेले असते. त्यामुळे काळाबरोबर नेहमीच स्पर्धा सुरु असते. मात्र यातील विक्कीची घालमेल सुरु आहे ती या काळाच्या विळख्यातून बाहेर पडण्याची ती यातून यशस्वीरित्या सुटेल का ते या ट्रेलरवरुन दिसेल.

हेदेखील वाचा- Tikiti Tok Song in Vicky Velingkar: घड्याळ्याच्या काट्यावर धावणा-या लोकांची झालेली अवस्था मांडेल विक्की वेलिंगकरमधील 'टिकीटी टॉक' हे गाणे

या सिनेमाचं दिग्दर्शन सौरभ वर्मा यांनी केले आहे. या चित्रपटात सोनालीसह स्पृहा जोशी, विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे, संग्राम समेळ आणि रमा जोशी यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 6 डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

काही दिवसांपूर्वी चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी स्वतः या सिनेमाचा टीझर आपल्या ट्विटर अकाउंट वरून शेअर केला होता. या टीझर मध्ये 'लाईफ इज फुल ऑफ सरप्राइजेस' असं म्हणत सोनाली पूर्णतः बिनधास्त अंदाजात दिसून आली. यात “ती काळाच्या विळख्यातून सुटू शकेल का?,” हा प्रश्न टीझर मधून समोर ठेवण्यात आल्याने या सिनेमात काहीतरी रहस्यमय कथानक पाहायला मिळणार असल्याचे अंदाज बांधले जात आहेत.