'पप्पी दे पारूला' या गाण्याने अवघ्या तरुणाईला वेडं लावणारी स्मिता गोंदकर (Smita Gondkar) या गाण्याने जितकी चर्चेत आली तितकीच या गाण्यातील तिच्या बिकिनीमधील हॉट लूक मुळे. त्यानंतर बिग बॉस मराठी च्या पहिल्या पर्वातही तिचा हॉट, बोल्ड आणि क्यूट लुक ही सर्वांना भावला. फिटनेसच्या बाबतीत नेहमी आग्रही असणारी स्मिता तिच्या मादक अदांमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ती चर्चेत आहे ती तिने 'ये रे ये रे पैसा 2' (Ye Re Ye Re Paisa 2) साठी केलेल्या हॉट बिकिनी फोटोशूटमुळे. नुकताच तिने आपल्या बिकिनीमधील हॉट लूक सोशल मिडियावर शेअर केले आहे.
स्मिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बिकिनीमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये स्मिता अत्यंत हॉट आणि सेक्सी अंदाजात दिसत आहे. हे फोटो शेअर करताच तिच्या चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
ये रे ये रे पैसा 2 साठी तिने हे खास फोटोशूट केले होते. या फोटोखाली तिने या शूटमागील गंमत (Behind The Scenes)असे कॅप्शन दिले आहे.
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित‘ये रे ये रे पैसा 2’ नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात स्मिता ने विशेष भूमिका केली आहे. या चित्रपटाची निर्मिती अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट, पर्पल बुल एंटरटेनमेंट, ट्रान्स एफएक्स स्टुडिओज आणि पॅनारोमा स्टुडिओज यांनी केली आहे. हृषिकेश कोळी यांनी पटकथा संवाद लेखन केले. या चित्रपटात अभिनेते संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार अशी दमदार स्टारकास्ट आहे.