मराठी सेलिब्रिटी जे आहेत 'स्वामीं समर्थ' यांचे  एकनिष्ठ  भक्त
Photo Credits-File Image

''भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे'' असे मनात जरी म्हंटल तरी परिस्थिति सकारात्मक वाटू लागते असा अनुभव बऱ्याच जणांचा असेल. आज स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन. श्री स्वामी समर्थ अर्थातअक्कलकोट स्वामी. अक्कलकोट स्वामी हे इसवी सनाच्या 19 व्या शतकात होऊन गेलेले. महाराष्ट्रात अक्कलकोट स्वामींनी बराच काळ वास्तव केला होता. अक्कलकोट स्वामींना श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंगसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्ता दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत अस म्हंटल जाते.गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले असे ही म्हंटले जाते. स्वामींच्याआयुष्यावर ’देऊळ बंद’ हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटात स्वामींची भूमिका मोहन जोशी यांनी केली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे व प्रणीत कुलकर्णी यांनी केले होते. समाजात अनेक लोकांची स्वामींवर श्रद्धा आहे. याच यादीत अनेक सेलेब्रिटी ही आहेत. तर जाणून घेऊयात स्वामींच्या प्रकट दिनी त्यांना काय वाटत.

चिन्मय उद्गिरकर : 

गेले 18 वर्ष मी स्वामींची पोथी वचतोय शाळेत असताना माझ्या एक मित्राला स्वामींची पोथी वाचताना पाहिल होत. मला त्याच फार कौतुक वाटायच, हा एवढा शांत सगळ्यात हुशार कसा? मी त्याला विचारल तेव्हा त्याने हे सगळ स्वामींमुळे आहे अस सांगितले. त्यामुळे तेव्हापासून मी स्वामींची पोथी वाचायला सुरवात केली. तसेच माझ्या घरचे आधीपासून पोथी वाचायचे त्यामुळे मला घरात कोणी का? असा प्रश्न विचारला नाही. मला स्वतःला खुप अनुभव आले आहेत आणि बाहेरच्या गोष्टींपेक्षा आतला आत्मविश्वास आणि आतून स्ट्रॉन्ग असणे जास्त महत्वाच आहे, जे मी झालो. आताच्या कोरोना व्हायरसच्या गंभीर परिस्थीत मला एवढच वाटत की जे काही संकट आपल्यावर आले आहे ते काहीतरी वाईट गोष्टी नष्ट करण्यासाठी आले आहे. आताचा वेळ हा आपल्याला स्वतःबरोबर घालवण्यासाठी मिळालेला आहे.आपल्याला नक्की काय हवयं हे समजायला मिळालेला आहे. त्याचबरोबर आपण आज सगळे एकत्र आलोय एका गोष्टीशी एकत्र लढतोय त्यामुळे आपला उत्साह जगासमोर सगळयांना दिसतोय आणि लवकरच आपण यातून बाहेर पडू असा मला विश्वास आहे.

तितिक्षा - खुशबु तावडे:

मी आणि माझ कुटुंब गेल्या १० वर्षांपासून स्वामींना मानतोय. स्वामींच एक वाक्य आहे 'आम्हा आवडो अथवा न आवडो, स्वामी जे इच्छिसी तेचि घडो हे मागण्या न अवघडो, जीभ आमुची। म्हणजे जे स्वामींच्या मनात आहे तेच होणार, जे हवय तेच ते घडवून आणणार. त्यामुळे जे व्हायचे आहे ते होणार आपण याकडे नकारत्मकतेने न बघता सकारात्म दृष्टीने बघायला हवे. आज कोरोनाचा हा रोग जर हवेतुन पसरणारा असता तर परिस्थिति आणखी गंभीर असती. स्वामी सांगतात आपण प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहायला हव. आता आपल्याला आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवता येतोय त्यामुळे सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलायला हवा.

जुई गडकरी :

मी अगदी लहानपणापासून स्वामींना मानते किंवा त्यांच करते असे म्हणायला हरकत नाही . त्याच्या पाठी पण एक स्टोरी आहे. आम्ही जिथे राहतो कर्जतला त्याच्या पुढे एक गाव होते. तिथे माझे आजोबा राहायचे. त्यांच्या स्वप्नात नेहमी एक बैरागी यायचा जो त्यांना म्हणायचा 'तू मला सोडून गेला आहेस' आम्हाला तेव्हा काहीच कळायच नाही. त्यानंतर काही काळाने आम्ही कर्जतला आमचा वाडा बांधायला घेतला. तेव्हा आम्हाला त्या ठिकाणी पादुका लागल्या आणि त्याच्या बाजूला आधीच दोन औदुंबराची झाड आहेत. हे सगळ स्वतः घडून आल्यासारख आहे. आम्ही त्या जागी दत्ताच मंदिर बांधल आणि स्वामी दत्तांचाच अवतार आहेत. मला माझ्या आयुष्यात खुप अनुभव आले आहेत. जेव्हा मला स्वामींनी मदत केली आहे आणि जेव्हा मी काही अडचणीतून बाहेर येऊ शकत नाही तेव्हा मी ते त्यांच्यावर टाकून मोकळी होते.

आज आपल्या आजूबाजूला जे काही सुरु आहे त्या पाठी काहीतरी कारण आहे हे नक्की.आपली पाप वाढली आहेत आणि निसर्ग कोणत्याना कोणत्या पद्धतीने त्याला उत्तर देतोच तसच आहे हे. आज मी फक्त स्वामींना एवढच सांगिन की, हे सगळ संकट लवकर थांबवा आणि आमच्या सगळ्यांची प्रतिकार शक्तित वाढ होणे सध्याच्या घडीला जास्त महत्वाचे आहे.