दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शिवराजअष्टकातील 'सुभेदार' (Subhedar) हा पाचवा सिनेमा 25 ऑगस्टला रिलीज झाला आहे. यासिनेमाला देखील प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. हा सिनेमा आता शाळकरी मुलांना सवलतीच्या दरात पाहता येणार आहे. निर्मात्यांकडून त्याबाबतची खास ऑफर जाहीर करण्यात आली आहे. सिने निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना हा सिनेमा 140 रूपयांमध्ये पाहता येणार आहे. महाराष्ट्रभर शाळकरी विद्यार्थ्यांसाठी 'सुभेदार' सिनेमा पीव्हीआर आणि आयनॉक्समध्ये प्रेक्षकांना सवलतीच्या दरात पहाता येणार आहे.
'सुभेदार' हा सिनेमा तानाजी मालुसरेंच्या सिंहगडावरील मोहिमेवर आधारित आहे. यामध्ये तानाजी मालुसरेंची प्रमुख भूमिका अभिनेता अजय पुरकर याने साकारली आहे. स्वराज्यासाठी घरात मुलाचं लग्न सोडून सिंहगड सर करायला गेलेल्या तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाची गाथा सिनेमात दाखवण्यात आली आहे.
पहा पोस्ट
विशेष ऑफर
- सिनेमाच्या शोची वेळ सकाळी 11 च्या आधी असणे आवश्यक आहे.
- सोमवार ते गुरुवार साठीच्या शो करिता ऑफर वैध.
- कन्फर्मेशन आणि पेमेंट 48 तासांपूर्वी आले पाहिजे.
- सकाळी 11 च्या आधी ज्या वेळेस त्यांना ज्या वेळेस त्यांना पीव्हीआर आणि आयनॉक्स स्क्रीनची आवश्यकता असेल, ती वेळ देण्यात येईल.
- प्रत्येक शोसाठी किमान तिकीट बुकिंग 100 तिकीटे असावी.
सुभेदार सिनेमाने रिलीजच्या पाच दिवसांत 6.83 कोटींचा गल्ला जमवला आहे. देशा-परदेशात त्याची बॉक्सऑफिस वर यशस्वी घौडदौड सुरू आहे. महाराष्ट्रात अनेक शोज हे हाऊसफुल्ल सुरू आहेत.