Savaniee Ravindrra होणार आई; सोशल मीडियात खास फोटोसेशन सह शेअर केली गूड न्यूज
Savaniee Ravindrra | Photo Credits: Instagram

मराठी सिनेसृष्टीतील गोड गळ्याची गायिका आणि तितकीच मोहक सावनी रविंद्र (Savaniee Ravindrra)आई होणार आहे. काल (29 मे) सावनीने ही गोड बातमी शेअर केली आहे. पती पती डॉ. आशिष धांडे सोबत खास केलेलं फोटोसेशन देखील तिने यावेळी शेअर केले आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वीच सावनीला यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार झाला आहे. त्यामुळे आता ही गोड बातमी म्हणजे सावानी सह तिच्या चाहत्यांसाठी डबल सेलिब्रेशन आहे. सावनीला यंदा 'बार्डो' चित्रपटातील रान पेटलं गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

3 वर्षांपूर्वी सावनी आणि आशिष धांडे विवाहबंधनात अडकले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मॅरेज अ‍ॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली आहे. आता सावनी आणि आशिष यांच्या आयुष्यामध्ये नव्या पर्वाची सुरूवात होणार असल्यने ते दोघेही उत्सुक आहेत. आज सावनीने इंस्टाग्राम वर पोस्ट लिहीत मनातील भावाना व्यक्त केल्या आहेत. 'तुम्हांला 'लाईफ' काय असतं हे तो पर्यंत समजत नाही जोपर्यंत ते तुमच्यामध्ये वाढत नाही.' अशा कॅप्शनसह सावनीने फोटो पोस्ट केला आहे.

सावनी रविंद्र पोस्ट

दरम्यान सावनी मराठी सह अनेक भारतीय भाषांमध्ये गायली आहे. 2011 च्या सारेगम या रिएलिटी शो ची सावनी ही अंतिम स्पर्धकांपैकी एक होती. अनेक मराठी मालिकांची टायटल सॉंग्स , स्पेशल सॉंग्स, मराठी, हिंदी स्टेज शोज मधून सावनी रविंद्र रसिकांच्या भेटीला आली आहे.

मागील काही महिन्यांत श्रेया घोषाल, प्रियांका बर्वे, शशांक केतकर, अरोह वेलणकर, निपुण धर्माधिकारी यांच्या घरी चिमुकल्यांचं आगमन झाल्यानंतर आता सावनीने देखील गूड न्यूज दिली आहे. सावनीच्या पोस्टवर अनेक कलाकार, गायक मंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव करून तिचं अभिनंदन केले आहे.