मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडे कोणाला करतेय डेट; सोशल मिडियावर फोटो शेअर करुन दिली प्रेमाची कबुली
Sanskruti Balgude (Photo Credits: Instagram)

मराठी चित्रपटांसह मालिका आणि डान्स रिअॅलिटी शो मधून स्वत:ची अशी विशेष ओळख निर्माण केलेली, निखळ हास्याने आणि गोड खळीने सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री संस्कृती बालगुडे कोणाला डेट करतेय याबाबत सर्वांनाचा उत्सुकता होती. तिचा बॉयफ्रेंड कोण आहे याबाबत तिच्या चाहत्यांमध्ये अनेक चर्चा रंगत होत्या. या सर्व चर्चांना पुर्णविराम देत संस्कृतीने स्वत:च आपल्या प्रेमाची कबुली देऊन आपण कोणाशी डेट करत आहोत, त्याचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे.

इतकचं नव्हे तर या फोटो खाली तिने असे म्हटले आहे की, "अनेकांना प्रश्न पडला होता की मी रिलेशनशिपमध्ये आहे का, कुणाला डेट करते आहे, तर याचं उत्तर आहे हे… हाच तो ज्याला मी डेट करत आहे. हाच माझा एकमेव बॉयफ्रेंड."

पाहा फोटो

यात तिने अभिनेत्री नेहा पेंडसेला ही टॅग केलं आहे. कारण नेहानेही अशाच कुत्र्यासोबत एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला होता.

हेही वाचा- मराठीतील हॉट अभिनेत्री नेहा पेंडसे कुणाच्या पडली प्रेमात; सोशल मिडियावर शेअर केल्या 'त्या' च्यासोबतचा फोटो

हा फोटो पाहून सर्वांना हसू येण्यापेक्षा तिच्या तरुण चाहत्यांचा जीव भांड्यात पडलाय. तिच्या फोटोला खूप मजेशीर कमेंट्स येत असून संस्कृती अजूनही सिंगल आहे हे पाहून तिचे तरुण चाहते खूश झालेत.

'सांगते ऐका' या चित्रपटातून पदार्पण केलेल्या संस्कृतीची झी मराठी वाहिनीवरील 'पिंजरा' या मालिकेमधील भूमिका खूप गाजली होती.