सिनेसृष्टीतील सिंगल असलेल्या लोकप्रिय कलाकारांच्या लग्नाच्या, साखरपुड्याच्या चर्चा होणे काही नवीन नाही. यात बॉलिवूडसह मराठी कलाकारांच्याही चर्चाही तितक्याच रंगतात. त्यातील एक नाव समोर येतय ती मराठीतील हॉट अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) हिचे. तिचे ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो ती नेहमीच सोशल मिडियावर शेअर करत असते. पण नुकताच तिने एका व्यक्तीसोबतचा फोटो शेअर केला आहे. ह्या फोटोसोबत नेहा हार्टचे सिम्बॉल सुद्धा दिले असल्यामुळे हाच नेहाचा होणारा नवरा असावा, असा चाहत्यांमध्ये चर्चा रंगू लागल्यात.
काही दिवसांपूर्वी अभिनेता अभिजीत खांडकेकरने (Abhijeet Khandkekar) सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत अभिनेत्री नेहा पेंडसेला शुभेच्छा दिल्या होत्या. या शुभेच्छा कशाबद्दल होत्या हे मात्र स्पष्ट केले नव्हते. आता नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे, त्यात तिच्या बोटातील रिंग सुद्धा दिसत आहे. त्यामुळे तिचा साखरपुडा झाल्याचीदेखील जोरदार चर्चा सुरू आहे.
हा फोटो पाहून नेहाच्या चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा, शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मात्र नेहाने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
हेही वाचा- नेहा पेंडसे अडकणार लग्नाच्या बेडीत? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
नेहाने अनेक मराठी तसेच हिंदी मालिका, चित्रपट आणि रिअॅलिटी शोमधून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रात काम करण्याआधी तिने दक्षिण भारतीय चित्रपटांमधून देखील काम केलं होतं.
झी मराठीवरील 'भाग्यलक्ष्मी' या मालिकेत तिने सहनशील गृहिणीची भूमिका केली होती. तिची ही मालिका चांगलीच गाजली होती.