Sangeet Manapmaan Movie Review: अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर दिग्दर्शक सुबोध भावे दिग्दर्शित ‘संगीत मानापमान’ हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘संगीत मानापमान’ या चित्रपटात सुबोध भावे आणि वैदेही परशुरामी यांच्यासह सुमित राघवन, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. 'कट्यार काळजात घुसली' नंतर आता अभिनेता सुबोध भावे पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची कथा ही सर्वांना परिचित असून कृष्णाजी खाडिलकर आणि गोविंदराव टेंबे यांची अजरामर नाट्यकृती 'संगीत मानापमान' रंगभूमीवर गाजले असून बालगंधर्व यांनी देखील या कलाकृतीत काम केले होते. अशी गाजलेली कलाकृती चित्रपटाच्या रुपाने समोर येत असताना लोकांनी लोकांची मोठी अपेक्षा या चित्रपटाकडून होती परंतू हा सिनेमा अपेक्षांवर पुर्ण ठरत नसून त्यांची काही प्रमाणात निराशाच करतो. (हेही वाचा - Pune International Film Festival: यंदाच्या 23 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे वेळापत्रक बदलले; आता होणार 13 ते 20 फेब्रुवारी दरम्यान)
चित्रपटाची कथा -
संग्रामपूर राज्यातील ज्येष्ठ सेनापती (शैलेश दातार) हे त्यांच्या जागी उपासेनापती चंद्रविलासची (सुमीत राघवन) सेनापती पदावर निवड करण्याचे जाहीर करतात. सेनापतींची मुलगी भामिनी(वैदेही परशुरामी) आणि चंद्रविलास हे दोघे लहानपणापासूनचे मैत्र. महत्वाकांक्षी अन् काहीसा स्वार्थी असलेला चंद्रविलास सेनापतीपद मिळवून भामिनीशी लग्न करण्याची स्वप्न रंगवतो. तर दुसरीकडे संग्रामपूरमधील एक सामान्य धैर्यधर.(सुबोध भावे) धैर्यधर पुढे त्याचं धाडस सिद्ध करून संग्रामपूरच्या सैन्यात भरती होतो. ज्येष्ठ सेनापती धैर्यधराच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होतात. भामिनीच्या वाढदिवशी ते धैर्यधराच्या आईसमोर भामिनी आणि धैर्यधराच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवतात. पण या प्रस्तावाला भामिनी धुडकावून लावत धैर्यधराच्या कुटुंबाचा अपमान करते. तर सुडाच्या भावनेने चंद्रविलास भामिनीच्या मनात धैर्यधराबद्दल विष कालवतो.यानंतरचे मानापमान म्हणजे 'संगीत मानापमान'.
चित्रपटाची समिक्षा
संगीत मानापमान या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय, संगीत, पटकथा, कॅमेरावर्क ही जमेची बाजू असून सुरुवातीला पात्रांची ओळख करून देण्यासाठी वापरलेली गाणी ही फारच जमून आलेली आहेत. राजवाड्याचा भव्यदिव्य सेट, बाजारपेठ अशा बाबींवरही बारकाईने काम केलंय. या सर्व जमेच्या बाजू असल्यातरी अनेक उणिवांदेखील या सिनेमत आहेत. यातील सर्वात मोठी निराश करणारी बाब म्हणजे जुन्या गाण्यांची बदललेली चाल. या सोबतच पटकथेत असेलेल्या काही उणीवांमुळे अनेक सिन्स नाटकासारखे प्रभावशाली होत नाही. तसेच क्लायमॅक्सला देखील विनाकारण ताणला सारखाच वाटतो.