Girlfriend Trailer: सई ताम्हणकर आणि अमेय वाघ यांची लव्हस्टोरी उलगडणारा 'गर्लफ्रेंड' चा ट्रेलर प्रदर्शित
GirlFriend Trailer (Photo Credits: Youtube)

जन्मापासून सिंगल असणाऱ्या मुलाला जेव्हा अचानक गर्लफ्रेंड पटते, तेव्हा घडणारी इंटरेस्टिंग गोष्ट सांगणारा 'गर्लफ्रेंड' (Girlfriend) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. अमेय वाघ (Amey Wagh) आणि सई ताम्हणकर (Sai Tamhankar) यांची गोड केमिस्ट्री या मध्ये दाखविण्यात आली आहे. अमेय आणि सईने या चित्रपटात नचिकेत आणि अलिशा यांची भूमिका साकारली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन उपेंद्र सिधये यांनी केले आहे. तर निर्मिती रणजित गुगळे आणि अनिश जोग यांची आहे.

या ट्रेलरमध्ये सईचा लूक हा वाखाणण्याजोगा आहे. तर अमेय ही थोडा जाड दिसत असून त्याची भूमिकाही हटके असेल असे एकूणच या ट्रेलरवरुन दिसत आहे.

जेव्हा या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले होते, तेव्हा अमेय ची गर्लफ्रेंड कोण असेल याबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती. त्यानंतर अलीकडेच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला. त्यात सई ताम्हणकर ला पाहून प्रेक्षकांची या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीनच वाढली. आयुष्यात ज्या मुलाची कधीच कोणी गर्लफ्रेंड बनू शकली नाही, त्याच्या आयुष्यात जेव्हा एक सुंदर मुलगी येते तेव्हा त्याचे आयुष्य कसे बदलते त्याचा सुंदर प्रवास यात मांडण्यात आला आहे.

हेही वाचा- Girlfriend Teaser 2: सई ताम्हणकर हिच्या व्यक्तिरेखेची झलक दाखवणारा 'गर्लफ्रेंड' सिनेमाचा टीझर आऊट

'गर्लफ्रेंड' हा चित्रपट येत्या 26 जुलै ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमेय आणि सई व्यतिरिक्त रसिका सुनील, ईशा केसकर, सुयोग गो-हे, कविता लाड, सागर देशमुख प्रमुख भूमिकेत दिसतील.