कागर: तळपत्या उन्हात झळाळून निघणार, तिच्या स्वप्नांचा गुलाल उधळणार; रिंकू राजगुरु पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला
Rinku Rajguru on Kagar Movie poster | (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Kagar Movie first poster release: 'सैराट' (Sairat) चित्रपटात रिंकू राजगुरु(Rinku Rajguru) हिने साकारलेली आर्ची चांगली भाव खाऊन गेली. पदार्पणातच नुसते कौतुकच नव्हे तर थेट राष्ट्रपती पदकालाही आर्चीने गवसणी घातली. हीच आर्ची आता पुन्हा एकदा नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अर्थात या चित्रपटात तिची भूमिका वेगळी असेल हे काही सांगायलाच नको. तिच्या आगामी कागर (Kagar Movie) चित्रपटाचे पोस्टरही नुकतेच प्रदर्शित झाले. या चित्रपटाच्या माध्यमातूनच ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

तळपत्या उन्हात झळाळून निघणार

तिच्या स्वप्नांचा गुलाल उधळणार

जुना जाणार तेव्हाच नवा येणार…'कागर'

...अशा शब्दांत कागर सिनेमाच्या पोस्टरच्या माध्यमातून रिंकू राजगुरी हिची एण्ट्री दाखवली आहे. पोस्टर पाहून तर चित्रपटाबाबत उत्सुकता वाढते आहे. प्रत्यक्षात चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे मात्र चित्रपट चित्रपटगृहात आल्यानंतरच कळणार आहे. ‘रिंगण’ आणि ‘यंग्राड’ यांसारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या मकरंद माने यांनी 'कागर' चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यामुळे कागरबाबतही जोरदार उत्सुकता आहे. (हेही वाचा, HSC Exam 2019: रिंकू राजगुरु हिला त्रास नको म्हणून अतिरिक्त पोलीस तैनात; आर्चीला पाहण्यासाठी गर्दी तर होणारच!)

दरम्यान, व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, रिंकू राजगुरु हिची इयत्ता बारावीची परीक्षा सुरु असल्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते.