Pic Credit - Instagram

राज्यात सध्या मराठा समाजाचे (Maratha Samaj)मागासलेपण तपासण्यासाठीचे सर्वेक्षण सुरु असून या कामासाठी महानगर पालिकेचे (BMC Employess) कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहे. काही दिवसापुर्वी अभिनेता पुष्कर जोगच्या (Pushkar Jog) घरी सर्वेक्षण करण्यासाठी बीएमसी कर्मचारी गेले होते. मात्र, त्यांनी विचारलेल्या काही जातीवरील प्रश्नावरून अभिनेता पुष्कर जोग चांगलाच भडकला होता. मध्यंतरी त्याने याबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. यावेळी त्यांने महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांबद्दल अपमानजनक भाषेचा देखील वापर केला होता. (हेही वाचा - Pushkar Jog On Cast: पुष्कर जोगवर भडकले BMC कर्मचारी, तत्काळ माफी मागण्याची केली मागणी)

पाहा पुष्कर जोगची पोस्ट -

Pushkar Jog Apology On BMC Employees

या पोस्टवरून पुष्करला अनेकांनी खडेबोल सुनावले आहे. यावरून आता पुष्करने दिलगिरी व्यक्त करत इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे. “मी रविवारी एक पोस्ट केली होती. ज्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की, मी केवळ माणुसकी हाच धर्म मानतो. अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम होते. वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. माझ्या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो.” असं त्यांने आपल्या पोस्टमध्ये लिहले आहे.

दरम्यान  पुष्कर जोग दिग्दर्शित ‘मुसाफिरा’ चित्रपट येत्या 2 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात पुष्कर जोगसह पूजा सावंत, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी व पुष्कराज चिरपुटकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.