बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) फेम अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) सध्या मुंबई महानगरपालिका (BMC) कर्मचाऱ्याबद्दल केलेल्या पोस्टमुळे चर्चेत आला आहे. मात्र आता या अभिनेत्याला निषेधाचा सामना करावा लागतो आहे. म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी पुष्करचा जाहीर निषेध केला आहे. या संदर्भात रमाकांत बने यांनी मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्त यांना पत्र लिहित अभिनेत्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवाय त्याने माफी मागितली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही दिला. कर्तव्याचे पालन करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांबद्दल केलेल्या निंदनीय वक्तव्याबद्दल पुष्कर जोगचा निषेध देखील व्यक्त केला आहे.
पाहा फोटो -
पुष्करने एक इन्स्टाग्राम स्टोरी केली त्यात त्याने असे लिहिले की, 'काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय अशी माहिती देऊन माझी जात विचारत होते. त्या कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर 2 लाथा नक्कीच मारल्या असत्या... कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील.' असे त्याने म्हटले.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री केतकी चितळेनेही याच प्रकरणात बीएमसीच्या महिल्या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यामुळे सोशल मीडियावर हा वाद चांगलाच चर्चेत आला आहे.