ठाकरे सिनेमा: चित्रपटाच्या निमित्ताने सेना-मनसे नेत्यांमध्ये मनोमिलन पण, 'मानापमान' कायम
Producer Sanjay Raut and director Abhijit Panse Verbal flint during Thackeray movie screening | (Photo courtesy: archived, edited, representative image)

Movies this week: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीचे औचित्य साधत बहुचर्चीत 'ठाकरे' चित्रपटाचे स्क्रीनिंग (Thackeray Movie Screening) काल म्हणजेच 23 जानेवारीला करण्यात आले. या चित्रपटाच्या निमित्ताने शिवसेना (Shiv Sena) आणि मनसे (MNS) यांच्यात अनोखे मनोमिलन पहायाला मिळत असले तरी, त्यांच्यातील 'मानापमान' नाट्यमात्र कायम आहे. स्क्रीनिंगदरम्यान, दिग्दर्शक अभिजीत पानसे (Director Abhijit Panse) यांना बसायला योग्य जागाच मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज होऊन परतले. चित्रपटाचे निर्माते संजय राऊत (Producer Sanjay Raut ) यांनी या प्रकारानंतर बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. तर, दुसऱ्या बाजूला 'ठाकरे' सिनेमाला शुभेच्छा देताना बाळासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधत मनसेने खोचक टोलेबाजी करत पोस्टर्स लावले.

मुद्दा असा की, शिवसेना नेते संजय राऊत 'ठाकरे' चित्रपटाचे निर्माते आहेत. तर, मनसे नेते अभिजीत पानसे दिग्दर्शक. राजकीय भूमिकांमध्ये कमालीचे साधर्म्य असूनही हे दोन पक्ष राजकारणाच्या फडात आमनेसामने असतात. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही पक्ष आणि त्या पक्षाचे प्रमुख यांचे दौवत एकच. त्यामुळेच कदाचित निर्माता शिवसेना नेता तर दिग्दर्शक मनसे नेता असा जुळवून आणलेला योगायोग पाहायला मिळतो आहे.

दरम्यान, चित्रपटाचे प्रमोशन करत असताना दिग्दर्शक अभिजीत पानसे यांना डावलले जात असल्याची मनसेची भावना आहे. त्यामुळेच मनसेकडून पोस्टरबाजी करण्यात आल्याची चर्चा आहे. तर, चित्रपटाचे स्क्रिनिंगदरम्यान संजय राऊत आणि अभिजित पानसे यांच्यात थिएटरबाहेरच शाब्दिक चमकम उडाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. त्यानंतर पानसे यांना स्क्रिनिंगदरम्यान बसायलाही सिट मिळाली नसल्याने ते स्क्रिनिंग अर्धवट सोडूनच परतले. (हेही वाचा, 25 ते 27 जानेवारी दरम्यान शिवसैनिक चाहत्यांना देणार मोफत 'ठाकरे' पाहण्याची संधी, पहा कधी, कुठे कसा?)

दरम्यान, या सर्व प्रकारावर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना दिलेली प्रतिक्रिया अशी की, मान्यवर आणि विशेष निमंत्रितांना बसण्यासाठी विशेष आसनव्यवस्था करण्यात आली होती. मात्र, पानसे नेमके उशिरा आले. त्यामुळे सीटच उरल्या नाहीत. दरम्यान, पानसे यांच्या स्क्रिनिंग दरम्यान निघून जाण्यावर विराचले असता, पानसे यांना काहीतरी काम होतं आणि कार्यक्रमात सगळेच ये-जा करत असतात असे राऊत म्हणाले.