The Shivaji Trilogy: शिवजयंती 2020 चं औचित्य साधत सैराट फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील 3 चित्रपटांच्या सीरीजची घोषणा केली आहे. 'शिवाजी', 'राजा शिवाजी', 'छत्रपती शिवाजी' अशी या चित्रपटांची नावं असून 2021ला रसिकांसमोर ते येणार असल्याची माहिती खास ट्वीटच्या माध्यमातून नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी दिली आहे. आज शिवजयंतीचं औचित्य साधत खास व्हिडिओच्या माध्यमातून या आगामी प्रकल्पाची घोषणा केली आहे. दरम्यान व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेल्या झलक मध्ये रितेश देखमुख (Ritesh Deshmukh), अजय-अतुल (Ajay Atul) आणि नागराज मंजुळे ही नावं दाखवण्यात आली आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत रितेश देशमुख दिसण्याची शक्यता आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून रितेश लवकरच शिवरायांच्या भूमिकेत दिसणार अशा चर्चा रंगल्या होत्या. आता याबाबतचे संकेत मिळाल्याने रितेश देशमुखच्या रसिकांमध्ये विशेष उत्सुकता वाढली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर रितेश देशमुख बनवत आहे बायोपिक, अजय देवगण ने केला खुलासा
रितेश देशमुख, अजय-अतुल यांच्या सोबतीने घेऊन येतोय शिवत्रयी अशा आशयाचं ट्विट करताना नागराज मंजुळेने पुढील वर्षी हा सिनेमा रसिकांसमोर येईल असं म्हटलं आहे. सैराट या सिनेमाच्या माध्यमातून नागराज मंजुळे लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. लवकरच अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिकेतील 'झुंड' सिनेमाच्या माध्यमातून नागराज बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वीच झुंड सिनेमाचा टीझर रसिकांच्या भेटीला आला आहे.
शिवाजी महाराजांवरील शिवत्रयीची पहिली झलक
एखाद्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभं राहणं म्हणजे हेच असावं कदाचित...आज शिवरायांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे सांगायला लय आनंद वाटतोय की
रितेश देशमुख, अजय-अतुल यांच्या सोबतीने घेऊन येतोय शिवत्रयी
शिवाजी
राजा शिवाजी
छत्रपती शिवाजी
शिवरायांच्या जन्मदिनाच्या खूप साऱ्या सदिच्छा 🙏🌹 pic.twitter.com/r4GaizGCeE
— nagraj manjule (@Nagrajmanjule) February 19, 2020
नागराज मंजुळेंच्या सैराट चित्रपटाने बॉक्सऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी केली होती. या चित्रपटाने आजपर्यंतच़े सर्व विक्रम मोडीत काढत 110 कोटींची कमाई केली होती. या सिनेमातून रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे दोन नवखे चेहरे मराठी सिनेसृष्टीला नागराज मंजुळेंनी दिले.