Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha Controversy: 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' मधून आक्षेपार्ह दृष्यांना महेश मांजरेकरांकडून कात्री; आज सिनेमा प्रदर्शित
Varan Bhat Loncha Kon Nay Koncha | ( Archived, edited, symbolic images )

महाराष्ट्रात सिनेमागृहं पुन्हा खुली करण्यात आल्यानंतर सिनेसृष्टीतून दिग्दर्शक, निर्मात्यांनी आपले तयार सिनेमे रिलीज करायला सुरूवात केली आहे. मराठी मध्येही दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' (Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha) प्रदर्शनासाठी सज्ज आहे. पण या सिनेमाच्या ट्रेलर मध्ये काही बोल्ड सीन्स असल्याने सिनेमा वादाच्या भोवर्‍यात अडकला होता. महिला आयोगाने तक्रार केल्यामुळे या चित्रपटाचा ट्रेलर सर्व प्लॅटफोर्मवरून हटवण्यात आला होता.

दरम्यान 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' या सिनेमाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आज आपली प्रतिक्रिया जारी करत 'ट्रेलर मधील काही सीन्सवर आक्षेप घेण्यात आला आहे पण आमचा हेतू कुणाच्या भावना दुखावण्याचा नव्हत्या. सध्या समोर येत असलेल्या प्रतिक्रियेनुसार त्यांच्या भावनांचा मान राखत आक्षेपार्ह दृष्य ट्रेलर आणि सिनेमामधूनही काढून टाकली जातील.' असे त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान आक्षेपार्ह सिन्सला कात्री लावत हा सिनेमा 14 जानेवारी म्हणजे आज चित्रपटगृहांमध्ये रीलिज करण्यात आला आहे.

आक्षेपार्ह दृष्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगानं या चित्रपटाचा विरोध करत केंद्रीय माहिती प्रसारण खात्याकडे तक्रार केली होती. या सिनेमाला यापूर्वीच 'ए' सर्टिफिकेट देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही संवेदनशील वाटणार्‍या सिन्सला कात्री लावण्याचा निर्णय झाला आहे. वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ चित्रपटाचा ट्रेलर 10 जानेवारी रोजी युट्युबवर प्रदर्शीत झाला होता. पण आक्षेपानंतर तो हटवण्यात आला आहे आता नवा ट्रेलर जारी करण्यात आला आहे.