'नाळ' चित्रपटातील 'चैत्या' या तेलगु चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
श्रीनिवास पोकळे (PC - Instagram)

मागच्या वर्षी दिग्दर्शक नागराज मंजुले (Nagraj Manjule) यांच्यासोबत 'नाळ' (Naal) चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावणारा 'चैत्या' आता एका तेलगु चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चैत्या म्हणजेचं बाल कलाकर श्रीनिवास पोकळे (Shreenivas Pokale) याने 'नाळ' चित्रपटातून मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. नाळ चित्रपटातील चैत्याचे डायलॉग प्रेक्षकांच्या आजही तोंडपाठ आहेत. आता श्रीनिवास तेलगु चित्रपट 'जॉर्ज रेड्डी' (George Reddy) या चित्रपटात दिसणार आहे.

या चित्रपटात श्रीनिवास मुख्य अभिनेत्याच्या बालपणाची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट येत्या 29 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी श्रीनिवासने तेलगु भाषेचे धडे गिरविले आहेत. श्रीनिवासने या चित्रपटाचे पोस्टर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये श्रीनिवास डोक्यावर पुस्तक घेऊन स्मितहास्य करताना दिसत आहे.  (हेही वाचा - 56 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव: 8 पुरस्कारांची पारितोषिके घोषित, या दहा चित्रपटांमध्ये चुरस)

श्रीनिवास पोकळे इन्स्टाग्राम पोस्ट - 

 

View this post on Instagram

 

#shripokale ,#marathifilm ,#marathiactors ,#chaitya ,#georgereddy ,#georgereddytrailer

A post shared by Shrinivas Pokale (@shri.pokale) on

नाळ चित्रपटातील 'जाऊ दे नवं', या गाण्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यानंतर श्रीनिवास कोणत्या चित्रपटात दिसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. श्रीनिवासने 'जॉर्ज रेड्डी' या चित्रपटासाठी भरपूर मेहनत घेतली आहे. त्यामुळे श्रीनिवासला या दाक्षिणात्य चित्रपटात पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

View this post on Instagram

 

#shripokale ,#chaitya ,#naalmovie ,#marathiactors ,#childactors,#photoshoot

A post shared by Shrinivas Pokale (@shri.pokale) on

नाळ चित्रपटात श्रीनिवासने लोकांची मन जिकंली होती. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे श्रीनिवासला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. दरम्यान, त्याच्या आई-वडिलांनी श्रीनिवासने चित्रपटसृष्टीतचं काम करावं, अशी इच्छा व्यक्त केली आहे.