Mulshi Pattern Official Trailer :  २३ नोव्हेंबरला रीलिज होणार 'मुळशी पॅटर्न' !
'मुळशी पॅटर्न' Photo credit : YouTube

Mulshi Pattern Official Trailer : शेतकर्‍यांचे प्रश्न, महानगराचा झपाट्याने होणारा विकास, महानगर आणि लगतच्या गावातील गुन्हेगारीचे भीषण वास्तव या विषयावर फिरणार्‍या 'मुळशी पॅटर्न' (Mulshi Pattern ) या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. मुळशी हा वारकऱ्यांचा, उद्योजकांचा तालुका आहे. याला गुन्हेगारीचं स्वरूप कसं आलं हा या चित्रपटाचा केंद्र बिंदू आहे.  प्रविण तरडे यांनी या सिनेमाची कथा, पटकथा लिहली असून त्यांनीच या सिनेमाचे दिगदर्शनही केले आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमातील 'अराराssss' हे गाणं रीलिज करण्यात आलं होतं. त्याला युट्युबवर चाह्त्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.

'मुळशी पॅटर्न' (Mulshi Pattern ) या सिनेमामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीला आणि काही गुन्ह्यांमध्ये अडलेल्या कलाकारांचा सहभाग असल्याने वाद रंगला होता. मात्र हे वाद झुगारून आता सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. प्रविण तरडे यांच्यासह या सिनेमामध्ये महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, मोहन जोशी महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत.

23 नोव्हेंबरला 'मुळशी पॅटर्न' (Mulshi Pattern ) हा सिनेमा रिलिज होणार आहे. अभिजित भोसले जेन्यूइन प्रोडक्शन्स एलएलपी आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. 'देऊळबंद'सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांचे लेखन प्रवीण तरडे यांनी केले आहे.