Manasi Naik च्या लग्नसोहळ्यातील तुमच्याकडून मिस झालेले काही खास क्षण व्हिडिओजद्वारे अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर केले शेअर, Watch Videos
Manasi Naik-Pradeep Kharera Wedding (Photo Credits: Instagram)

'बाई वाड्यावर या' या गाण्यातून आपल्या दिलखेचक अदांनी अवघ्या महाराष्ट्राला वेडं लावणारी अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) हिचे नुकतेच लग्न पार पडले. तिचा बॉयफ्रेंड आंतरराष्ट्रीय प्रदीप खरेरा (Pradeep Kharera) हिच्या सोबत तिने 19 जानेवारी लग्नगाठ बांधली आणि तिने नव्या आयुष्यात पाऊल टाकले. कुमारी मानसी नाईक झाली सौ. मानसी प्रदिप खरेरा.... तिचा लग्नसोहळा हा तिच्या चाहत्यांसाठी खूपच चर्चेचा विषय होता. तिच्या लग्नसोहळ्यातील कोणतेही क्षण आपल्याकडून मिस होऊ नये म्हणून अनेक चाहत्यांनी तिला सोशल मिडियाद्वार फॉलो करत सर्व व्हिडिओज आणि फोटोज पाहिले. मात्र त्यातही काही चाहत्यांचा एखादा क्षण मिस झाला असेल तर मानसी ने या लग्नसोहळ्यातील व्हिडिओज सोशल मिडियावर शेअर केले आहे.

मानसीने आपल्या मेहंदी सेरेमनी, लग्नातील डोली, पाठवण या सर्वांचे व्हिडिओज तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manasi Naik Kharera (@manasinaik0302)

आपल्या चाहत्यांसाठी मानसीने खास हे व्हिडिओ शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manasi Naik Kharera (@manasinaik0302)

या व्हिडिओजमधून मानसीच्या चाहत्यांना तिच्या लग्नसोहळ्यातील प्रत्येक क्षण याचि देही, याचि डोळा अनुभवता येईल.हेदेखील वाचा- Mansi Naik Wedding: अभिनेत्री मानसी नाईक अडकली विवाहबंधनात; दीपाली सय्यद, रेशम टिपणीस ची लग्नाला उपस्थिती (View Pics)

 

View this post on Instagram

 

A post shared by Manasi Naik Kharera (@manasinaik0302)

 

View this post on Instagram

 

A post shared by Manasi Naik Kharera (@manasinaik0302)

सध्या मानसी आपल्या पतीसह त्याच्या गावी फरिदाबादला गेली आहे. तेथील शेतात आपल्या पती प्रदिप खरेरासोबत तिने काढलेले फोटोज सोशल मिडियावरही तिने शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manasi Naik Kharera (@manasinaik0302)

मानसीचा ग्रहमाक पूजेपासून ते तिच्या लग्नापर्यंत सर्वच फोटोज सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेक प्रसारमाध्यमांनी मानसीचा हा शाही लग्नसोहळा कव्हर केला होता. त्यामुळे तिच्या चाहत्यांना सोशल मिडियाच्या द्वारे हे क्षण अनुभवता आले.