Manasi Naik च्या लग्नविधींदरम्यान तिच्या आईने घेतलेला उखाणा ऐकून होणारा जावई प्रदीप खरेरा ने या व्हिडिओखाली केले 'हे' खास कमेंट, Watch Video
Manasi Naik Wedding (Photo Credits: Instagram)

आपल्या जबरदस्त नृत्याविष्काराने मराठी प्रेक्षकांना वेडं लावणारी अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) हिचा उद्या म्हणजेच 19 जानेवारी आंतरराष्ट्रीय बॉक्स प्रदीप खरेरा (Pradeep Kharera) याच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे या दोघांच्या घरी लग्नविधींना जोरदार तयारी सुरु झाली आहे. नुकताच मानसीच्या घरी ग्रहमाग पूजा झाली. अगदी घरच्या घरी कुटूंबातील लोकांसह हा पूजा विधी पार पडला. मात्र यात एक मजेशीर गोष्ट घडली. मानसीच्या आईने या शुभप्रसंगी एक खणखणीत उखाणा (Ukhana) घेतला. हा व्हिडिओ मानसीने सोशल मिडियावर शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी देखील कौतुकाचा वर्षाव केला. विशेष म्हणजे त्यांच्या होणा-या जावयाने प्रदीप खरेराने देखील खास कमेंट केले.

या व्हिडिओमध्ये मानसीच्या बाजूला तिचे आई आणि बाबा बसले आहेत. तेव्हा सर्वजण तिच्या आईला उखाणा घ्यायला सांगतात. त्यावर तिच्या आईने घेतलेला हा जबरदस्त उखाणा एकदा ऐकाच

 

View this post on Instagram

 

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

या व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्या पोस्ट खाली 'आकाशाचा केला कागद समुदाची केली शाई, तरीही आईचा महिमा लिहीता येणार नाही' असे कॅप्शन दिले आहे.हेदेखील वाचा- Manasi Naik Grahmag Puja Vidhi: मानसी नाईकच्या घरी लग्नविधींना सुरूवात, अभिनेत्रीचा झाला गृहमुखाचा कार्यक्रम, See pics

या उखाणा ऐकल्यानंतर त्यांचा होणारा जावई प्रदीप खरेरा याने 'MASaaataaaaaa' असे लिहून त्यापुढे हृदयाचे इमोजी टाकले आहे.

पुण्यात 19 जानेवारीला प्रदीप खरेरासोबत मी विवाहबंधनात अडकणार आहे. लग्नाआधीच मेहेंदी आणि संगीत सोहळा 18 जानेवारीला म्हणजेच आज होणार आहे. हळदीचा कार्यक्रम लग्नाच्याच दिवशी 19 जानेवारीला होईल. मानसीसाठी तिच्या खास मैत्रिणी दिपाली सय्यद आणि सीमा कदम यांनी खास स्पिंनस्टर पार्टीचे देखील आयोजित केली होती. त्याचे फोटोज देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले होते.