सलील कुलकर्णी  यांच्या तक्रारीनंतर Girlz सिनेमाचा पोस्टर अखेर बदलला; पहा नवीन पोस्टर
Saleel Kulkerni (Photo Credits: Facebook)

विशाल देवरूखकर दिग्दर्शित आगामी 'गर्ल्स' सिनेमाचं पोस्टर (Girlz Poster) 10 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आला. तेव्हापासूनच बोल्ड अंदाजातील हे पोस्टर प्रचंड चर्चेमध्ये आहे.

काही दिवसांपूर्वी या पोस्टरवरून संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी निषेध व्यक्त केला होता. पोस्टरवरील मुख्य पात्राच्या टी शर्टवर 'आयुष्यावर बोलू काही.. FamilySucks' असं लिहलेलं होतं. व त्यासोबतच मुख्य पात्रातील अभिनेत्री काही असभ्य इशारे करताना दिसत होती. 'आयुष्यावर बोलू काही' हे सलील यांच्या कराक्रमाचे नाव असल्यामुळे त्यांनी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून आपला निषेध व्यक्त केला होतं.

पहा नवीन पोस्टर

या तक्रारीची त्वरित दखल घेत 'गर्ल्स' चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकताच पोस्टरवरील 'आयुष्यावर बोलू काही' हा मजकूर काढून नवीन पोस्टर प्रदर्शित केले आहे. आणि म्हणूनच सलील यांनी देखील त्यांची फेसबुक पोस्ट मागे घेतली आहे.

'आयुष्यावर बोलू काही...' कार्यक्रमाचा अपमान असल्याचंं सांगत Girlz Poster चा संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्याकडून निषेध

तसेच पोस्टर शेअर करताना, चित्रपटाचा टीमकडून कोणालाही दुखावण्याचा हेतू नसल्याचा संदेशही लिहिण्यात आला, "सकाळच्या पोस्टरमुळे काही गैरसमजुती निर्माण होऊन, काही ठिकाणी चुकीचे मेसेज फिरवले जात आहेत. आमचा 'गर्ल्स' हा सिनेमा यूथफुल असला तरी कुटुंबासोबत बघता यावा असा आहे. आम्ही हे पोस्टर कोणालाही दुखावण्याच्या हुतूने बनवलेले नाही. आपण सगळे एका कुटुंबासारखेच आहोत या भावनेने आम्ही नवीन पोस्टर सादर करत आहोत."