यंदा महाराष्ट्र राज्य निर्मितीचं हिरक महोत्सवी वर्ष आहे. पण कोरोना व्हायरस सावटाखाली असलेला महाराष्ट्र लॉकडाऊनमुळे घरात बसला आहे. सध्या कोव्हिड 19 जागतिक महामारीचा सामना करत अवघं जग करत आहे त्यामुळे आपल्याही सुरक्षित राहण्यासाठी आज संचारबंदी पाळणं बंधनकारक आहे. पण मराठी कलाकारांनी 'बघतोस काय मुजरा कर' म्हणत एक स्पेशल व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. लॉकडाऊनमुळे घरातच असलेल्या सार्या कलाकारांनी महाराष्ट्राला मानवंदना म्हणून हा खास व्हिडीओ घरात बसूनच शूट केला आहे. सुमित राघवन, लोकेश गुप्ते, शशांक केतकर, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव,प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी असे कलाकार तर याच्यासह दिग्दर्शक संजय जाधव, हेमंत ढोमे झळकले आहेत. सांस्कृतिक, कला, साहित्य, खाद्यसंस्कृती, पर्यटन ते धार्मिक स्थळं यांचा मोठा वारसा महाराष्ट्राला आहे. या खास व्हिडिओमध्ये त्याची देखील झलक पहायला मिळाली आहे. Maharashtra Day 2020 Images: महाराष्ट्र दिन शुभेच्छा मराठी Wishes, Messages, HD Wallpapers च्या माध्यमातून देत साजरा करा हा खास दिवस!
60 व्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा यंदा मराठी कलाकारांनी अशा खास अंदाजामध्ये दिल्या आहेत. दरम्यान थोड्याच वेळापूर्वी हॅलो इंडियाच्या युट्युब चॅनलवर 'वैभव महाराष्ट्राचं' या खास व्हिडीओच्या माध्यमातून मराठी कलाकारांनी या शुभेच्छा दिल्या आहेत. Maharashtra Day Quotes: गोविंदाग्रज ते रामदास स्वामी यांच्या शब्दांत महाराष्ट्राची महती पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रं, ग्रिटिंग्स !
मराठी कलाकारांकडून 60व्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
महाराष्ट्र यंदा 60 व्या वर्षात पदार्पण करत आहे. 1960 साली मराठी जनतेने एकवटून संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढला. 107 जणांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. आजही मुंबईच्या हुतात्मा चौकामध्ये या शहिदांचं स्मरण करून त्यांना मानवंदना दिली जाते.