महाराष्ट्राची आवडती व लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाड (kartiki Gaikwad) अखेर विवाहबंधनात अडकली आहे. कार्तिकी आणि रोनित पिसे यांचा मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा पार पडला. गेल्या काही महिन्यापासून कार्तिकीच्या चाहत्यांना तिच्या लग्नाची उत्सुकता होती अखेर आज तो क्षण आला. कार्तिकीची मैत्रिण आर्या आंबेकर हिने इन्स्टाग्रामवर विवाह सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. अगदी मोजकेच नातेवाईक व जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. कार्तिकीच्या लग्नासाठी आर्या आंबेकरसह अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, गायिका मुग्धा वैशंपायन यांनीही हजेरी लावली होती.
जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये कार्तिकीच्या पाहण्याचा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. त्यानंतर 26 जुलै रोजी कार्तिकी व रोनित यांचा साखरपुडा झाला. हे लग्न डिसेंबरमध्ये होणार असल्याचे आधीच समजले होते. याआधी कार्तिकीने, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना आपल्या विवाहाने निमंत्रण दिले होते. कार्तिकीने आपले वडील गायक-संगीतकार कल्याणजी गायकवाड यांच्यासोबत वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
View this post on Instagram
View this post on Instagram
दरम्यान, कार्तिकीचा नवरा रोनित पिसे हा मेकॅनिकल इंजिनिअर असून त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. रोनित हा मुळचा पुण्याचा आहे. कार्तिकीचे वडिल कल्याणजी गायकवाड यांच्या मित्रपरिवारातील हे कुटूंब आहे. कार्तिकी व रोनितचे हे अरेंज मॅरेज आहे. महत्वाचे म्हणजे रोनितला देखील संगीताची आवड आहे. त्याला उत्तम तबला वाजवता येतो. त्याने तबल्याच्या तीन परीक्षा देखील दिल्या आहेत.
View this post on Instagram
2009 साली झी मराठीच्या 'सा रे ग म प- लिटिल चॅम्प्स' हा शोद्वारे कार्तिकीने आपल्या करियरची सुरुवात केली होती. या शोदरम्याने तिने सबंध महाराष्ट्राचे मन जिंकले होते. तिने कलर्स वाहिनीवरील ‘राइझिंग स्टार’ या रिअॅलिटी शो मध्येही सहभाग घेतला होता ‘गजर कीर्तनाचा’ या कार्यक्रमाचे निवेदनही ती करत आहे.