Pulawama Terror Attack:  मने कोरडी रक्तानेही भिजली नाही... Jitendra Joshi ने कवितेच्या माध्यमातून व्यक्त केल्या भावना
Jitendra Joshi poem on Pulwama Terror Attack (Archived, edited, representative images)

Jitendra Joshi Poem On Pulwama Terror Attack:  14 फेब्रुवारीच्या दुपारी जम्मू काश्मिर येथिल पुलवामा (Pulwama) भागामध्ये श्रीनगर-जम्मू हायवे नजीक अवंतिपोरा परिरसरात CRPF च्या जवानांच्या बसवर हल्ला झाला. जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammad ) या दहशतवादी संघटनेकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यामध्ये 40 जवान ठार झाले आहेत. उरीनंतर  (Uri) सगळयात मोठ्या समजल्या जाणार्‍या या दहशतवादी हल्ल्याची जागतिक स्तरावर निंदा केली जात आहे. देशभरात भारतीयांना या हल्ल्यानंतर संताप आणि रोष व्यक्त केला आहे. हळव्या कवी मनाचा लेखक, अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) यानेदेखील कवितेच्या माध्यामातून आपल्या भावना मोकळ्या केल्या आहे. Pulwama Terror Attack: पुलवामा येथील भ्याड हल्ल्याप्रकरणी रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह अनेक खेळाडूंनी ट्विट करत व्यक्त केल्या भावना

पुलवामी दहशतवादी हल्ल्यावर जितेंद्र जोशी याची कविता

 

View this post on Instagram

 

सरणावरची आग अजूनही विझली नाही मुले पौरकी शाहीदांची हो निजली नाही निलाजर्या लोकांचे जगणे अप्पलपोटी मने कोरडी रक्तानेही भिजली नाही आग लागली अवतीभवती मनात पण ठीणगीहि नाही अब्रू स्वाभिमान चिरडला कितीक किड्यांसम फुटले ती गणतीही नाही सहिष्णुतेचा बुरखा घेऊन जगतो आम्ही मरण ओढतो अजूनही आमची जिरली नाही धर्म जाहला शाप पसरले पाप उरी अंधार दाटला गिळून घेईल साप लागुनी धाप कोवळा जीव फाटला अणु रेणूंचा स्फोट होऊनी जळतो आम्ही देवा(?) आता मनात आशा उरली नाही निलाजर्या लोकांचे जगणे अप्पलपोटी मने कोरडी रकतानेही भिजली नाही -जितेंद्र जोशी #पुलवामा #PulawamaTerrorAttack

A post shared by jitendra shakuntala joshi (@jitendrajoshi27) on

जितेंद्र प्रमाणेच मराठी, हिंदी सिनेसृष्टीमध्ये काम करणार्‍या कलाकारांनी, खेळाडूंनी देखील त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. शहिदांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.