Hruta Durgule झळकणार टाईमपास 3 मध्ये? इंस्टाग्राम पोस्ट मधून नव्या प्रोजेक्टचे संकेत
Hruta Durgule | Photo Credits: Instagram / Hruta Durgule

केतकी माटेगावकर, प्रिया बापट यानंतर आता टाईमपास 3 मध्ये आता अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) ची वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान मीडीया रिपोर्ट्सनुसार, हृताने टाईमपास 3 साठी होकार दिल्याचं बोललं जात आहे. रवी जाधव (Ravi Jadhav) दिग्दर्शित टाईमपास 3 (Timepass 3) या सिनेमाची सध्या प्री- प्रॉडक्शन स्टेज सुरू आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरीही रवी जाधव यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडीयामध्ये टाईमपास 3 बद्दल काही संकेत दिले होते. त्यामध्ये त्यांनी टाईमपास मधील लोकप्रिय डायलॉग आई, बाबा आणि साईबाबा शप्पथ... असं सोशल मीडीयामध्ये पोस्ट केले होते. त्यामुळे आता टाईमपास 3 ची घोषणा होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

ऋता दुगुळे पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta (@hruta12)

ऋता दुगुळेने सध्या इंस्टाग्रामवर पल्लवी अशी कॅप्शन देत आणि बोटांनी 3 दाखवत एक खास फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिने हॅशटॅगद्वारा नवी भूमिका, लवकरच नवी घोषणा असं म्हटलं आहे. Fresh Lime Soda Poster: मराठी चित्रपट 'फ्रेश लाईम सोडा' चे पोस्टर प्रदर्शित, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे ही जोडी पुन्हा येणार एकत्र.

दरम्यान ऋता दुगुळे मराठी मालिकांमधून घराघरात पोहचली आहे. काही महिन्यांपूर्वी तिने 'सिंगिंग स्टार' या रिएलिटी शो चं सूत्रसंचलन देखील केले आहे. लवकरच 'अनन्या' या चित्रपटातून ती सिनेमांमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या ती 'दादा एक गूड न्यूज आहे.' या नाटकामध्ये उमेश जाधव बरोबर मुख्य भूमिकेत काम करत आहे. लॉकडाऊन नंतर सध्या हे नाटक पुन्हा रंगमंचावर सादर होण्यास सुरूवात झाली आहे.