मराठी कलाक्षेत्रामध्ये विनोदवीरांची मोठी परंपरा आहे. सध्याच्या फळीमध्ये अशाच एक दर्जेदार अभिनेता आपल्या विनोदी भूमिकांसाठी गाजला तो म्हणजे अभिनेता मकरंद अनासपुरे. मकरंद अनासपुरे यांचा वाढदिवस आहे. दरम्यान महाराष्ट्राला मकरंद अनासपुरे हे नाव केवळ अभिनय क्षेत्रासाठी परिचित आहे असे नाही. विनोदी अभिनय शैलीसोबतच मकरंद अनासपुरे यांनी ग्रामीण भागात शेतकर्यांसाठी देखील काम केले आहे. अभिनेते नाना पाटेकरांसोबत त्यांनी ' नाम' संस्था स्थापना करून कर्जबाजारी झालेल्यांना, आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. सध्या मकरंद अनासपुरे सिनेमा, रंगभूमी यांपासून थोडे लांब असले तरीही त्यांनी केलेल्या अनेक भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहेत. मग आज त्यांच्या बर्थ डे निमित्ताने पहा त्यांच्या काही सिनेमांमधील जबरदस्त कॉमेडी सिन्स
मकरंद अनासपुरे यांचे धम्माल कॉमेडी सिन्स
मकरंद अनासपुरे हा कलाकार मूळचा मराठवाड्याचा आहे. त्याच्या बोलण्यात असलेला मराठवाड्याचा हेल रसिकांना खास आवडला आहे. अनेक जण त्यासाठी देखील त्यांचे चाहते आहेत. मकरंद अनासपुरे यांचे शिक्षण मराठवाड्यात झाले. त्यांनी कलेचं प्राथमिक शिक्षण घेतलं आहे. औरंगाबादमधील न.भु. कॉलेजमध्ये अभिनयाचे प्राथमिक धडे घेतले होते. अभिनयाची आवड असणार्या मकरंद अनासपुरे यांनी कॉलेज मध्ये असल्यापासूनच नाटकांमध्ये काम करायला सुरूवात केली होती.
दरम्यान मकरंद अनासपुरे विनोदी भूमिकांसाठी विशेष गाजले असले तरीही त्यांनी रंगा पतंगा सारख्या अन्य गंभीर सिनेमांमध्येही उल्लेखनीय काम केले आहे.