मुलांप्रमाणे मुलीही आपल्या आयुष्यात हवी ती मजा करु शकतात आणि मनमुराद, बिनधास्त आपले आयुष्य जगू शकतात असे सांगणारा Girlz चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. बॉईज' (Boyz) आणि 'बॉईज 2' (Boyz 2) या धमाकेदार चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल देवरुखकर (Vishal Devrukhkar) यांचा नवा कोरा सिनेमा 'गर्ल्स' (Girlz) हा प्रदर्शनाच्या अगोदरच प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच नुकताच प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरमध्ये अंकिता लांडे (Ankita lande), केतकी नारायण (Ketaki Narayan) आणि अन्विता फलटणकर (Anvita Phaltankar) यांच्या हटके अदा पाहून या चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढेल.
या ट्रेलरमध्ये मुलींना देण्यात आलेले संवाद हा मराठीतील पहिला प्रयोग असेल असे दिसतय. तसेच या 3 अभिनेत्रींची धम्माल, राजा, पबमधील धमाल-मस्ती तुम्हाला या ट्रेलरमध्ये पाहायला मिळेल.
Girlz चा ट्रेलर:
हेदेखील वाचा- Swag Mazya Fatyavar Song In Girlz Movie: 'स्वॅग माझ्या फाट्यावर' म्हणत 'गर्ल्स' गॅंग सोबत थिरकली 'बॉईझ'ची टोळी (Watch Video)
हृषिकेश कोळी लिखित आणि नरेन कुमार निर्मित 'गर्ल्स' सिनेमामध्ये मुलींच्या रंजक भावविश्वाची सफर घडणार आहे. येत्या 29 नोव्हेंबर रोजी हा नवा कोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
आयुष्यात मज्जा-मस्ती करणं मुलींचं काम नाही असे म्हणणा-यांसाठी हा चित्रपट एक सडेतोड उत्तर असेल असं या ट्रेलरवरुन दिसतय. अलीकडे या चित्रपटातील 'आईच्या गावात' (Aaichya Gavat) हे भन्नाट गाणं घेऊन प्रेक्षकांची भेट घेतल्यावर आता 'स्वॅग माझ्या फाट्यावर' (Swag Mazya Fatyavar) म्हणत ही गर्ल्स गॅंग पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.