कोरोनाने देशभरात पुन्हा एकदा डोकं वर काढले असताना पश्चिम बंगाल मध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. यात राजकीय पक्षांच्या सभांना असंख्य प्रमाणात लोक उपस्थित राहून सोशल डिस्टंसिंगचे नियम धाब्यावर बसवत आहे. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बंगालमधल्या प्रचारसभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विध्वंस (Sameer Vidwans) यांनी ट्विटद्वारे या निर्णयाचे कौतुक केले आहे. हा खूप चांगला आणि धाडसी निर्णय असल्याचे समीर विध्वंस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
"ह्या कठिण काळात राहूल गांधीनी बंगालमधल्या प्रचारसभा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत धाडसी आणि गरजेचा आहे! जबाबदारी आणि संवेदना जपणारा आहे! जनतेप्रती असलेलं कर्तव्य ते पार पाडतायत असं जाणवून देणारा आहे. हेच बाकी सर्व पक्षांनी करायला हवं!" असे ट्विट समीर विध्वंस यांनी केले आहे.हेदेखील वाचा- Rahul Gandhi: पश्चिम बंगाल राज्यातील राहुल गांधी यांच्या आयोजित सर्व सभा रद्द, कोरोना व्हयरस संकटामुळे निर्णय
ह्या कठिण काळात राहूल गांधीनी बंगालमधल्या प्रचारसभा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत धाडसी आणि गरजेचा आहे! जबाबदारी आणि संवेदना जपणारा आहे! जनतेप्रती असलेलं कर्तव्य ते पार पाडतायत असं जाणवून देणारा आहे. हेच बाकी सर्व पक्षांनी करायला हवं!
— Sameer Vidwans (@sameervidwans) April 18, 2021
देशभरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. तर राजकिय पक्षांच्या सभेत प्रंचड गर्दी होत असल्याने राहूल गांधी यांनी हा निर्णय घेतला आहे. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली. कोविडचं संकट लक्षात घेता, "मी पश्चिम बंगालच्या माझ्या सर्व सभा, रॅली रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय पक्षांनी विचार करायला पाहीजे की अशा राजकीय सभा जनतेसाठी किती धोकादायक आहेत." असे ट्विट राहुल गांधी यांनी केले होते.
राहुल गांधींच्या या निर्णयाचे काँग्रेस नेत्यांकडूनही स्वागत केले जात आहे. हे अन्य पक्षांसाठी चांगले उदाहरण असेल असे अनेकांचे म्हणणे आहे.