मराठी चित्रपटसुष्टीतील सुपरस्टार भरत जाधव यांनी आपल्या अभिनयाने मराठी प्रेक्षकांना भूरळ पाडली आहे. सध्या त्यांच्या नव्या नाटकाची 'तू तू मी मी' या नव्या नाटकाचा नुकताच शुभारंभ झाला आहे. तसेच भरत जाधव यांचे सही रे सही हे नाटक देखील अजूनही जोरात सुरु आहे. भरत जाधव यांच्या विनोदाच्या टाईमिंगमुळे प्रेक्षक ही त्याच्यावर मनापासून प्रेम करतात.
मुंबईच्या चाळीत वाढलेला भरत जाधव आपल्या साधेपणामुळे देखील ओळखला जातो. आपल्या वैयक्तिक आयुष्यात भरत जाधव नेहमीच साधेपणा जपला आहे. पंरतू त्याच्या चाहत्यांना सध्या भरतने एक धक्का दिला असून त्याने मुंबई शहराला कायमचा रामराम केला आहे. यापुढे तो कोल्हापूरात आपल्या परिवारासह राहणार आहे. सध्या आपल्या गावी कोल्हापूरला राहत असून त्याने हा निर्णय का घेतला यामागचं कारण एका मुलाखतीत सांगितलं आहे.
मुंबई सोडण्याचे कारण भरतने सांगितले की ''मुंबई आता बिझनेस हब झाली आहे. मुंबईच्या वेगाशी मला जुळवून घेणं कठीण जातंय. त्यात माझं वय सरत चाललंय.'' जगण्यासाठी आपल्याजवळ पैसेही हवेत आणि आरोग्याकडेही लक्षही द्यायला हवे म्हणून मी मुंबईबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. मुंबईत काम करून मिळणारे पैसे आणि इथे होणारा खर्च हा सारखाच आहे. खर्च भागवण्यासाठी आपण पैसे कमावतो असे मला वाटू लागले आणि मी हा निर्णय घेतला.'
या सगळ्या आर्थिक बाबींचा विचार करून मी कोल्हापूरला स्थायिक होण्याचे ठरवले. आणि विशेष म्हणजे आम्ही तिथे राहावे, अशी माझ्या आईची इच्छा होती म्हणून आम्ही कोल्हापूरला आमच्या गावी राहायला आलो.' असे भरत म्हणाला.