Baipan Bhaari Deva Box Office Collection: 'बाईपण भारी देवा'चे रेकॉर्डब्रेक कलेक्शन; तीन आठवड्यात 50 कोटींची कमाई
Baipan Bhari Deva (Photo Credit - Instagram)

केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा'  (Baipan Bhari Deva) चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे.  'बाईपण भारी देवा' चित्रपटाचा तिसऱ्या आठवड्यातही कमाईचा आलेख उंचावला आहे.  सहा बायकांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडलं आहे.  30 जूनला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपट प्रदर्शित होऊन अजून तीन आठवडेही पूर्ण झालेले नाही. 17 दिवसांतच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पन्नास कोटींचा गल्ला गाठला आहे.  या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे.  (हेही वाचा - Driver Cheated Rakhi Sawant: राखी सावंतची ड्रायव्हरकडून फसवणूक, फोन आणि लाखो रुपये घेऊन झाला फरार; चाहते म्हणाले, 'पगार दिला नसेल')

बाईपण भारी देवाने बॉक्स ऑफिसवर तर कमाई केली आहेच परंतु प्रेक्षकांच्या मनावरही राज्य केलं आहे. प्रत्येक स्त्री या चित्रपटाला स्वतः च्या आयुष्याशी रिलेट करते. सहा बहिणींच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाला स्त्रियांनी खूप गर्दी केली. चित्रपटाला अजूनही प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 6.10 करोडची कमाई केली.चित्रपटाने पहिल्या आठवड्यात बॉक्स आफिसवर 13.50 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या आटवड्यात चित्रपटाने दुप्पटीने म्हणजेच 26.19 कोटींची कमाई केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)

चित्रपटाने 50 कोटींची कमाई केली आहे. रविवारी 16 जुलैला एकाच दिवशी चित्रपटाने 5 कोटींची कमाई केली. चित्रपटाने आतापर्यंत 54.77 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाची कमाई पाहता चित्रपट अजूनही खूप कमाई करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.