Driver Cheated Rakhi Sawant: राखी सावंतची ड्रायव्हरकडून फसवणूक, फोन आणि लाखो रुपये घेऊन झाला फरार; चाहते म्हणाले, 'पगार दिला नसेल'

व्हिडिओमध्ये पुढे राखी सावंत म्हणाली, 'माझा ड्रायव्हर माझे पैसे, बीएमडब्ल्यू कारच्या चाव्या, सोन्याचा आयफोन आणि मर्सिडीज कार घेऊन फरार झाला. तो गरीब होता आणि म्हणूनच मी त्याच्यावर विश्वास ठेवला होता पण तो मला धोका याची मला फारशी कल्पना नव्हती. आयुष्यात कधी सुख मिळेल की नाही याची काळजी वाटते.'

Driver Cheated Rakhi Sawant: राखी सावंतची ड्रायव्हरकडून फसवणूक, फोन आणि लाखो रुपये घेऊन झाला फरार; चाहते म्हणाले, 'पगार दिला नसेल'
Rakhi Sawant (PC - Instagram)

Driver Cheated Rakhi Sawant: बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. यावेळी राखीच्या लव्ह लाईफला नाही तर तिच्या पैशाला ग्रहण लागले आहे. होय, अभिनेत्रीचा ड्रायव्हर तिच्या गाडीची चावी घेऊन पळून गेला आहे. शनिवारी राखी सावंतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती ऑटोमधून प्रवास करताना दिसत आहे. यादरम्यान, अभिनेत्रीचा चेहरा कोमेजलेला दिसत आहे. जेव्हा पापाराझीने राखी सावंतला काय झाले असे विचारले तेव्हा तिने सांगितले की सर्वजण फसवत आहेत आणि आता ड्रायव्हरने तेच केले. त्याने राखीचा विश्वास तोडून कार आणि पैसे घेऊन घरातून पळ काढला.

राखी सावंत व्हिडिओमध्ये म्हणतेय की, माझा यूपीचा ड्रायव्हर पप्पू मला भेटला तर मी त्याला चप्पलचा हार घालेल. तो माझे पैसे घेऊन तो पळून गेला. माझा सोन्याचा फोन घेऊन पळून गेला. त्याची बहीण माझ्या घरी काम करते. सध्या मी ओशिवरा पोलीस ठाण्यात तिच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहे. माझ्या आयुष्यात आणखी एक ग्रहण लागले आहे. (हेही वाचा - Akash Choudhary Accident: 'स्प्लिट्सव्हिला 10' फेम आकाश चौधरीचा रस्ता अपघात; थोडक्यात बचावला अभिनेत्याचा जीव)

व्हिडिओमध्ये पुढे राखी सावंत म्हणाली, 'माझा ड्रायव्हर माझे पैसे, बीएमडब्ल्यू कारच्या चाव्या, सोन्याचा आयफोन आणि मर्सिडीज कार घेऊन फरार झाला. तो गरीब होता आणि म्हणूनच मी त्याच्यावर विश्वास ठेवला होता पण तो मला धोका याची मला फारशी कल्पना नव्हती. आयुष्यात कधी सुख मिळेल की नाही याची काळजी वाटते.'

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राखी सावंतचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओवर फनी कमेंट करून चाहते सतत अभिनेत्रीची खिल्ली उडवत आहेत. एका यूजरने कमेंट करत 'मॅडम तो चंद्रावर गेला आहे' असे लिहिले. त्याच वेळी, इतरांनी लिहिले आहे की, ही खरोखर एक विनोदी कलाकार आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, 'राखी सावंतने त्याचा पगार दिला नसेल तेव्हाच तो पळून गेला'.

(The above story first appeared on LatestLY on Jul 17, 2023 01:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).