Ashalata Wabgaonkar Last Rites: 'इच्छापूर्ती', अलका कुबल यांच्याकडून अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
Ashalata Wabgaonkar,Alka Kubal | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अलका कुबल (Alka Kubal) आणि त्यांचे पती समीर आठल्ये यांनी अभिनेत्री आशालता वाबगावकर (Ashalata Wabgaonkar) यांच्या पार्थिवार अंत्यसंस्कार (Ashalata Wabgaonkar Last Rite) केले. अशालता वाबगावकर यांचे सातारा येथील खासगी रुग्णालयात मंगळवारी निधन झाले. त्यांची कोरना व्हायरस (Coronavirus) चाचणी पॉझिटीव्ह आली होती. दरम्यान, अलका कुबल आणि त्यांच्या पतीने आपल्यावर अंत्यसंस्कार करावेत अशी खुद्द आशालता वाबगावकर यांची इच्छा होती. ही इच्छा त्यांनी काही दिवसांपूर्वीच बोलून दाखवली होती, असे अलका कुबल यांनी सांगितले.

अलका कुबल आणि आशालता वाबगावकर या दोन्ही अभिनेत्री प्रदीर्घ काळापासून मैत्रिणी होत्या. दोघींच्या मैत्रीला साधारण 35 वर्षांहूनही अधिक काळ लोटला होता. दोघींनी मिळून अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, 'माहेरची साडी' हा चित्रपट दोघींच्याही आयुष्यात मैलाचा दगड ढरला. 1991 मध्ये प्रदर्शीत झालेल्या या चित्रपटाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. चित्रपटाच्या लोकप्रियतेसोबतच अलका कुबल आणि आशालता वाबगावकर या दोघी घराघरात पोहोचल्या.

अलका कुबल यांनी मुंबई मिररशी बोलताना सांगितले की, आशालता वाबगावकर या ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोडत होत्या. त्यामुळे आपण स्वत:च्या मर्जीने चित्रिकरणास तयार झालो आहोत हे त्यांनी लिहून दिले होते. दरम्यान, ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेचे चित्रिकरण सुरु असताना त्यांना सातारा येथेल कोरना व्हायरस संसर्ग झाला. चित्रिकरणाच्या सेटवरील 22 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला होता. मात्र, त्यातील अनेक जण पूर्ण बरे होऊन लगेच परत आले. आशालता यांना मात्र रुग्णालयात राहावे लागले. हळूहळू त्यांची प्रकृती ढासळत गेली. (हेही वाचा, Ashalata Wabgaonkar Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन, वयाच्या 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

पुढे बोलताना अलका कुबल यांनी सांगितले की, आशालता या मला मुलगी आणि माझ्या पतीला (समिर आठल्ये) जावई मानत असत. वेळ आलीच तर माझ्यावरचे शेवटचे विधी तू आणि तुझ्या पतीने करावेत, अशी इच्छा त्यांनी काही दिवसांपूर्वीच बोलून दाखवली होती. तसेच, माझ्या प्रकृतीबद्दल कुटुंबीयांना काही सांगू नको अशाही त्या म्हणाल्या होत्या. आम्ही रुग्णालयातही त्यांच्यासोबत होतो.

दरम्यान, त्यांच्या शरीरातील ऑक्सीजनची पातळी सोमवारी अचानक कमी झाली. त्यामळे त्यांना कृत्रिम जीवन प्रणालीवर ठेवण्यात आले. अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरना व्हायरसमुळे त्यांच्या कुटुंबीयांना साताऱ्याला येता आले नाही. त्यामुळे मी आणि माझ्या पतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले असे अलका कुबल यांनी सांगितले.