‘आणि…डॉ.काशिनाथ घाणेकरचा दमदार टीझर, 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' सोबत बॉक्सऑफिसवर भिडणार
आणि…डॉ.काशिनाथ घाणेकर’ टीझर Photo Credits : You tube

लोकमान्य - एक युगपुरूष, बालगंधर्व या चित्रपटानंतर अभिनेता सुबोध भावे पुन्हा चरित्रचित्रपट घेऊन आला आहे. यंदा दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सुबोध भावे ‘आणि…डॉ.काशिनाथ घाणेकर’हा सिनेमा घेऊन येणार आहे. आज या चित्रपटाचा पहिला टीझर लोकांच्या समोर आला आहे. 8  नोव्हेंबर 2018 ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटातील इतर कलाकारांच्या भूमिकांबाबत गुप्तता पाळण्यात आली होती.

‘आणि…डॉ.काशिनाथ घाणेकर’ टीझर 

मराठी रंगभूमीला सुवर्णयुग दाखवणार्‍या डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनपट पहिल्यांदा रूपेरी पडद्यावर साकरला जाणार आहे. या चित्रपटात सुबोध भावे प्रमुख भूमिकेत आहे. सोबतच सुलोचना दीदींची भूमिका सोनाली कुलकर्णी, श्रीराम लागूंच्या भूमिकेत सुमित राघवन, वसंत कानेटकरांची भूमिका आनंद इंगळे,  मोहन जोशी भालजी पेंढारकरांच्या भूमिकेत आहे.

वायोकॉम 18 प्रस्तुत हा सिमेमा यंदाच्या दिवाळीला रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन अभिजीत देशपांडेंनी केली आहे. या सिनेमा समोर यशराजच्या बहुप्रतिक्षित 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'चं आव्हान असणार आहे.