यंदा फिल्मफेअर्स अवॉर्ड्सचं चौथं वर्ष आहे. हिंदी सिनेसृष्टीप्रमाणे मानाचा समजला जाणारा सिनेसृष्टीतील हा एक ग्लॅमरस अवॉर्ड सोहळा आहे. त्यामुळे फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये मानांकन मिळवण्यापासून या सोहळ्यात परफॉर्मन्स करणं कलाकारांसाठी मानाचं असतं. यंदादेखील अनेक कलाकार 4थ्या फिल्मफेअर्स सोहळ्यांसाठी कसून तयारी करत आहेत.
4 था फिल्मफेअर सोहळा
यंदाच्या फिल्मफेअर सोहळयामध्ये अभिनेता स्वप्नील जोशी, स्मिता गोंदकर, अभिनय बेर्डे, अभिनेत्री अमृता खानविलकर अशी मराठीतील तगडी स्टारकास्ट अवॉर्ड शोमध्ये थिरकताना दिसणार आहेत. मराठी सिनेसृष्टीचा रोमॅन्टिक हिरो स्वप्निल जोशी त्याच्या सिनेमातील काही रोमॅन्टिक गाण्यांवर थिरकणार आहे तर अमृता खानविलकर या सोहळ्यात 'मुजरा' सादर करणार आहे.
.@swwapniljoshi has taken the stage at the rehearsals of the #JioFilmfareAwards (Marathi) 2018. pic.twitter.com/TY7kdQvIOZ
— Filmfare (@filmfare) September 27, 2018
यंदाच्या शोचं सूत्रसंचालन दिल दोस्ती दुनियादारीमधून मराठी रसिकांच्या घराघरात पोहचलेले अमेय वाघ आणि सुव्रत जोशी करणार आहे. त्यामुळे ग्लॅमरस रूपात आणि मिश्किल अंदाजात यंदाचा फिल्मफेअर सोहळा पार पडणार आहे.